mr_tw/bible/other/bronze.md

2.6 KiB

पितळ

व्याख्या:

"पितळ" या शब्दाचा संदर्भ, अशा प्रकारच्या धातुशी येतो, ज्याला तांबे आणि कथिल हे धातू एकत्र वितळून बनवले जाते. त्याचा गदग तपकिरी, थोडासा लालसर रंग असतो.

  • पितळ पाण्यामुळे गंजत नाही आणि ते उष्णतेचा चांगला वाहक आहे.
  • प्राचीनकाळी, पितळचा उपयोग साधने, शस्त्रे, कलाकृती, वेद्या, स्वयंपाकाची भांडी, आणि सैनिकांची शस्त्रास्त्रे, आणि इतर गोष्टी बनवण्यासाठी केला जात होता.
  • निवासमंडपाच्या आणि मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे बरेच साहित्य हे पितळेपासून बनवले जात होते.
  • बऱ्याचदा खोट्या देवांच्या मुर्त्या देखील पितळेच्या धातूंपासून बनवल्या जात होत्या.
  • पितळेच्या वस्तू, पहिल्यांदा पितळ धातू वितळवून, त्याचे द्रवामध्ये रुपांतर करून आणि नंतर मग तो साच्यात ओतून बनवल्या जात होत्या. या प्रक्रियेला "ओतकाम" असे म्हणतात.

(हे सुद्धा पहा: अज्ञात कसे भाषांतरित करायचे

(हे सुद्धा पहा: शस्त्रास्त्रे, निवासमंडप, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5153, H5154, H5174, H5178, G5470, G5474, G5475