mr_tw/bible/other/bribe.md

2.3 KiB

लाच, लाचलुचपत

व्याख्या:

"लाच" म्हणजे एखाद्या व्यक्तीला अप्रामाणिक असे काहीतरी काम करण्यासाठी, त्याला एखाद्या किमतीचे काहीतरी देणे, जसे की, पैसे.

  • जे सैनिक येशूच्या रिकाम्या कबरेचे रक्षण करीत होते, त्यांना जे घडले त्या बद्दल खोटे बोलण्यासाठी पैश्याची लाच देण्यात आली.
  • काहीवेळा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला गुन्हेगारास मागे टाकून किंवा विशिष्ट मार्गाने मत देण्यासाठी लाच दिली जाते.
  • पवित्र शास्त्र लाच देण्यास किंवा घेण्यास मनाई करते.
  • "लाच" या शब्दाचे भाषांतर "अप्रामाणिक पैसे" किंवा "खोटे बोलण्याची भरपाई" किंवा "नियम तोडण्याबद्दलची किंमत" असे केले जाऊ शकते.
  • "लाच" ह्याचे भाषांतर "(एखाद्याला) प्रभावित करण्यासाठी पैसे देणे" किंवा "अप्रामाणिक कृती केल्याबद्दल पैसे देणे" किंवा "मर्जी होण्यासाठी पैसे देणे" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3724, H4979, H7809, H7810, H7936, H7966, H8641, G5260