mr_tw/bible/other/blotout.md

3.1 KiB

काढून टाकणे, काढून टाकले, पुसून टाकणे, पुसून टाकतो, पुसून टाकले.

व्याख्या:

"काढून टाकणे" आणि "पुसून टाकणे" हे शब्द, अभिव्यक्ती आहेत, आणि त्यांचा अर्थ एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला पूर्णपणे काढणे किंवा नष्ट करणे असा होतो.

  • या अभिव्यक्तींचा सकारात्मक अर्थाने उपयोग केला जाऊ शकतो, जसे की, देव पापांना "काढून टाकतो" म्हणजे तो त्यांची क्षमा करतो आणि त्यांना परत आठवत नाही.
  • बऱ्याचदा ह्याचा उपयोग नकारात्मक अर्थानेसुद्धा केला जाऊ शकतो, जसे की, जेंव्हा देव लोकांच्या समूहाला "काढून टाकतो" किंवा "पसून टाकतो" तेंव्हा तो त्यांच्या पापामुळे त्यांचा समूळ नाश करतो.
  • पवित्र शास्त्र मनुष्याचे नाव, देवाच्या जीवनाच्या पुस्तकातून "काढून टाकणे" किंवा "पुसून टाकणे" ह्याबद्दल सांगते, ज्याचा अर्थ त्या व्यक्तीला सार्वकालिक जीवन मिळणार नाही.

भाषांतर सूचना:

  • संदर्भावर आधारित, या अभिव्याक्तींचे भाषांतर, "च्या पासून सुटका करून घेणे" किंवा "काढूणे" किंवा "पूर्णपणे नष्ट करणे" किंवा "पूर्णपणे काढून टाकणे" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा एखाद्याचे नाव जीवनाच्या पुस्तकातून काढून टाकण्याचा संदर्भात हा शब्द येतो, तेंव्हा ह्याचे भाषांतर, "च्या मधून काढून टकले" किंवा "पुसले" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3971, H4229, G631, G1591, G1813