mr_tw/bible/other/biblicaltimeyear.md

3.1 KiB

वर्ष, वर्षे

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये "वर्ष" हा शब्द जेंव्हा प्रत्यक्षात वापरला जातो, तेंव्हा त्याचा संदर्भ 354 दिवसाच्या वेळचा अवधीशी येतो. हे लुनार दिनदर्शिकेच्या प्रणालीनुसार आहे, जे पृथ्वीभोवती चंद्राच्या एका फेरीवर अवलंबून असते.

  • आधुनिक काळातील सौर दिनदर्शिकेमध्ये एक वर्ष 365 दिवसात 12 महिन्यांमध्ये विभागलेले आहे, जे पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी जो वेळ घेते त्यावर अवलंबून आहे.
  • दोन्ही दिनदर्शिका प्रणालीमध्ये, 12 महिन्यांचे वर्ष आहे. परंतु लुनार वर्ष हे सौर वर्षापेक्षा 11 दिवसांनी छोटे आहे, हे तथ्य लक्षात आणून देण्यासाठी, काहीवेळा, लुनार दिनदर्शिकेमध्ये 13 वा महिना जोडला जातो. यामुळे दोन दिनदर्शिका एकमेकांबरोबर अनुरूप राहण्यास मदत होते.
  • पवित्र शास्त्रामध्ये, जेंव्हा एखादी विशिष्ठ घटना घडते, तेंव्हा लाक्षणिक अर्थाने "वर्ष" या शब्दाचा संदर्भ सामान्य काळासाठी वापरला जातो. ह्याच्या उदाहरणामध्ये, "यहोवाचे वर्ष" किंवा "दुष्काळाच्या वर्षात" किंवा "प्रभूचे अनुकूल वर्ष' यांचा समावेश होतो. या संदर्भामध्ये, "वर्ष" याचे भाषांतर "वेळ" किंवा "हंगाम" किंवा "कालावधी" असेदेखील केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: महिने)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3117, H7620, H7657, H8140, H8141, G1763, G2094