mr_tw/bible/other/ambassador.md

3.2 KiB

वकील, राजदूत, प्रतिनिधी

व्याख्या:

राजदूत एक अशी व्यक्ती आहे जो अधिकृतपणे विदेशी राष्ट्राच्या संबंधात त्याच्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडली जाते. हा शब्द एखाद्या लाक्षणिक अर्थाने देखील वापरला जातो आणि काहीवेळा "प्रतिनिधी" म्हणून सामान्यतः भाषांतरित केला जातो.

  • एक राजदूत किंवा प्रतिनिधी लोकांना व्यक्तीकडून किंवा शासनाकडून पाठविलेला संदेश संदेश देतात
  • अधिक सामान्य संज्ञा "प्रतिनिधी" अशा व्यक्तीशी संदर्भीत आहे ज्याला एखाद्याने त्या व्यक्तीच्या वतीने प्रतिनिधित्व करून कृती करण्याचा आणि बोलण्याचा अधिकार दिलेला असतो.
  • प्रेषित पौलाने असे शिकवले, की ते ख्रिस्ताचे "राजदूत" किंवा "प्रतिनिधी" आहेत कारण ते या जगात ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करतात आणि इतरांना त्याचा संदेश शिकवतात.
  • संदर्भाच्या आधारावर, या शब्दांचा "अधिकृत प्रतिनिधी" किंवा "नियुक्त दूत" किंवा "निवडलेला प्रतिनिधी" किंवा "परमेश्वराचा नियुक्त प्रतिनिधी" म्हणून अनुवाद केला जाऊ शकतो.
  • "राजदूतांचे प्रतिनिधीमंडळ" चे भाषांतर "काही अधिकृत दूत" किंवा "नियुक्त केलेल्या प्रतिनिधींचे गट" किंवा "सर्व लोकांसाठी बोलण्यासाठी अधिकृत पक्ष" म्हणून अनुवादित केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहाः अज्ञात कसे भाषांतरित करायचे

(हे सुद्धा पहा: दूत)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3887, H4135, H4136, H4397, H6735, H6737, G4243