mr_tw/bible/names/stephen.md

3.7 KiB

स्तेफन

तथ्य:

स्तेफन हा पहिला ख्रिस्ती शहीद म्हणून सर्वात आठवणीत राहणारा ख्रिस्ती आहे, म्हणजेच तो पहिला व्यक्ती होता, ज्याला येशुवर त्याच्या असलेल्या विश्वासामुळे मारण्यात आले. त्याच्या जीवन आणि मृत्यूबद्दलची तथ्ये प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात नोंद केलेली आहेत.

  • स्तेफनाला विधवा आणि इतर गरजू ख्रिस्ती लोकांना अन्न पुरवण्याद्वारे त्यांची सेवा करण्यासाठी यरुशलेममधील आद्य मंडळीने सेवक म्हणून नियुक्त केले होते.
  • विशिष्ठ यहुद्यांनी स्तेफन हा देवाविरुद्ध आणि मोशेच्या नियमांविरुद्ध बोलतो असा त्याच्यावर दोष लावला.
  • स्तेफनाने, देव इस्राएल लोकांच्याबरोबर सुरुवातीपासून कसा वागला ह्याच्या इतिहासापासून सुरवात करून, तो येशू जो मसिहा ह्याबद्दल धाडसाने बोलला.
  • यहुदी पुढाऱ्यांनी आवेशात येऊन स्तेफनाला शहराबाह्रेर नेऊन मरेपर्यंत दगडमार केला.
  • त्याच्या देहदंडाचा साक्षी तार्ससचा शौल होता, जो नंतर प्रेषित पौल बनला.
  • स्तेफन हा त्याच्या मरणापूर्वीच्या शेवटच्या शब्दांसाठी प्रसिद्ध होता, "प्रभू तू त्यांचे हे पाप त्यांच्यावर लादू नकोस," जे इतर लोकांच्यासाठी असलेले त्याचे प्रेम दाखवते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: नियुक्त, सेवक, यरुशलेम, पौल, दगड, सत्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: G4736