mr_tw/bible/names/rehoboam.md

3.4 KiB
Raw Permalink Blame History

राहाबाम

तथ्य:

शलमोन राजाच्या मुलांपैकी राहाबाम हा एक मुलगा होता, आणि शलमोन मेल्यानंतर तो इस्राएल राष्ट्राचा राजा बनला.

  • त्याच्या राज्याच्या सुरवातीला, राहाबाम त्याच्या लोकांशी क्रूरतेने वागला, म्हणून इस्राएलाच्या दहा कुळांनी त्याच्याविरुद्ध बंड केले आणि उत्तरेस "इस्राएलाचे राज्य" स्थापन केले.
  • रहाबाम दक्षिणेकडील यहुदाच्या राज्याचा राजा म्हणून राज्य करत राहिला, ज्यामध्ये राहिलेल्या दोन कुलांचा, यहूदा आणि बन्यामीन ह्यांचा समावेश होता.
  • राहाबाम हा एक दुष्ट राजा होता, ज्याने यहोवाची आज्ञा मानिली नाही, पण खोट्या देवांची उपासना केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: इस्राएलाचे राज्य, यहूदा, शलमोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 18:05 शलमोनाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र रहोबाम हा राजा झाला. रहोबाम हा मूर्ख मनुष्य होता.
  • 18:06 रहोबामाने मूर्खपणाने उत्तर दिले,‘‘तुम्हांस वाटले असेल की माझा पिता शल्मोन हयाने तुमच्याकडून परिश्रम करुन घेतले, परंतु मी तर त्याहीपेक्षा अधिक परिश्रम तुमच्याकडून करुन घेईन व तुमच्याशी क्रूरतेने वागेन.
  • 18:07 इस्त्राएल राष्ट्राच्या दहा गोत्रांनी एकत्र येऊन रहोबामाविरुद्ध बंड पुकारले. केवळ दोनच गोत्रे त्याच्याशी विश्वासू राहिली.

Strong's

  • Strong's: H7346, G4497