mr_tw/bible/names/pilate.md

5.0 KiB
Raw Permalink Blame History

पिलात

तथ्य:

पिलात हा रोमी प्रांतातील यहुदियाचा सुभेदार होता, ज्याने येशूला मृत्युदंड देण्याचे घोषित केले.

  • कारण पिलात हा सुभेदार होता, म्हणून गुन्हेगारांना मृत्युदंड देण्याचा त्याला अधिकार होता.
  • पिलाताने येशूला वधस्तंभावर खिळावे अशी यहुदी धर्मपुढाऱ्यांची इच्छा होती, म्हणून ते खोटे बोलले आणि त्यांनी सांगितले की येशू एक गुन्हेगार होता.
  • पिलातला हे लक्षात आले होते की, येशू दोषी नव्हता, परंतु त्याला जमावाची भीती वाटत होती आणि त्याला त्यांना खुश करायचे होते, म्हणून त्याने आपल्या सैनिकांना येशूला वधस्तंभावर खिळण्याची आज्ञा केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: वधस्तंभावर खिळून मारणे, सुभेदार, दोष, यहुदिया रोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 39:09 दुस-या दिवशी सकाळीच, यहूदी पुढा-यांनी येशूला रोमी सुभेदार पिलातासमोर आणले. त्यांना आशा होती की पिलात येशूस दोषी ठरवून मरणदंडाची शिक्षा देईल. पिलाताने येशूला विचारले, ‘‘तू यहू़द्यांचा राजा आहेस काय?
  • 39:10 पिलाताने विचारले, ‘‘सत्य काय आहे?
  • 39:11 येशूबरोबर बोलल्यानंतर पिलात बाहेर असलेल्या जमावास म्हणाला, ‘‘मला या मनुष्यामध्ये काहीच दोष आढळत नाही. * परन्तु यहूदी पुढारी व लोकसमुदाय मोठयाने ओरडले, ‘‘त्याला वधस्तंभावर खिळून टाका! यावर पिलात उत्तरला, ‘‘तो निर्दोष आहे! पण ते आणखी मोठयाने ओरडू लागले. तेंव्हा पिलात तिस-यांदा म्हणाला, ‘‘तो निरपराध आहे.
  • 39:12 जमाव आपल्या विरुध्द बंड पुकारील अशी पिलातास भिती वाटली व त्याने आपल्या सैनिकांस येशूला वधस्तंभावर खिळण्याची आज्ञा दिली.
  • 40:02 पिलाताने त्यांना आज्ञा दिली की त्यांनी ‘‘यहूद्यांचा राजा’’ अशी लिहिलेली पाटी वधस्तंभाच्या वर येशूच्या डोक्यावर लावावी.
  • 41:02 पिलात म्हणाला, "काही सैनिकांना घ्या व त्या कबरेभोवती तुमच्याने होईल तितका चांगला बंदोबस्त ठेवा."

Strong's

  • Strong's: G4091, G4194