mr_tw/bible/names/perizzite.md

2.2 KiB

परिज्जी

तथ्य:

​कनान देशामध्ये राहणाऱ्या अनेक लोकसमुहापैकी परिज्जी हा एक गट होता. या समूहाबद्दल, जसे की त्यांचे पूर्वज कोण होते किंवा कनान मधील कोणत्या भागात ते राहिले या बद्दल खूपच कमी माहिती आहे.

  • जुन्या करारातील शास्ते या पुस्तकात परिज्जी लोकांचा उल्लेख बऱ्याच वेळा आला आहे, जिथे असे नमूद केले आहे की, परिज्जी लोकांनी इस्राएल लोकांच्या बरोबर अंतरवंशीय विवाह केला आणि त्यांना खोट्या देवांची उपासना करण्यासाठी प्रभावित केले.
  • पेरेशाच्या कुळाला "पेरेशी" असे म्हणतात, हा परिज्जी समूहापासून पासून एक वेगळा समूह होता, ह्याची नोंद करा. हे स्पष्ट करण्यासाठी ह्यांच्या नावाची अक्षरे वेगवेगळी वापरणे गरजेचे आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: कनान, खोटे देव)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H6522