mr_tw/bible/names/kedar.md

2.4 KiB

केदार

तथ्य:

केदार हा इश्माएलचा दुसरा मुलगा होता. हे एक महत्वाचे शहर देखील होते, ज्याचे नाव कदाचित त्या मनुष्यानंतर ठेवण्यात आले.

  • केदार शहर हे अरबस्तानच्या उत्तरी भागात आणि पलीष्ट्यांच्या सीमारेषेच्या जवळ स्थित होते. पवित्र शास्त्राच्या काळात, ते त्याच्या महान कार्याबद्दल आणि सुंदरतेबद्दल प्रसिद्ध होते.
  • केदारच्या वंशजांनी एक मोठा लोकसमूह तयार केला, त्यांना सुद्धा "केदार" असे म्हंटले गेले.
  • "केदारच्या तंबूसारखी काळी" या वाक्यांशाचा संदर्भ शेळीच्या काळ्या केसापासून बनवलेल्या तंबूत राहणाऱ्या केदारच्या लोकांशी येतो.
  • हे लोक शेळ्या आणि मेंढरे वाढवत होते. ते उंटांचा देखील वापर दळणवळणासाठी करत होते.
  • पवित्र शास्त्रामध्ये, "केदारचे वैभव" या वाक्यांशाचा संदर्भ त्या शहराशी आणि त्याच्या लोकांच्या महत्तेशी येतो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अरबस्तान, शेळी, इश्माएल, बलिदान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H6938