mr_tw/bible/names/artaxerxes.md

2.7 KiB

अर्तहशश्त

तथ्य:

अर्तहशश्त हा एक राजा होता जो इ.स. पूर्व 464 ते 424 इ.स.पूर्व काळात परसाच्या साम्राज्यावर राज्य करत होता.

  • अर्तहशश्त राजाच्या शासनकाळात, बाबेलमधील यहूदातील इस्राएल लोक हद्दपार झाले होते, जे त्या वेळी पारसाच्या ताब्यात होते.
  • अर्तहशश्तने एज्रा याजक व इतर यहुदी नेत्यांना बाबेल सोडून इस्राएलांना देवाचे नियमशास्त्र शिकवण्याकरता यरूशलेमेला परत जाण्याची परवानगी दिली.
  • नंतर याच काळात, अर्तहशश्तने त्याच्या प्यालेबरदार नहेम्या याला यरूशलेमला परत जाण्याची परवानगी दिली, जेणेकरून त्या शहराच्या सभोवताली असलेल्या भिंतींच्या पुनर्बांधणीसाठी त्याने यहुद्यांचे नेतृत्व करावे.
  • बाबेल पारसाच्या शासनाखाली होता म्हणून अर्तहशश्तांना काहीवेळा "बाबेलचा राजा" असेही म्हंटले जाते.
  • लक्षात ठेवा की अर्तहशश्त ही हशश्त (अहश्वरोश) सारखीच व्यक्ती नाही.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हेही पहा: अहश्वरोश, बाबेल, प्यालेबरदार, एज्रा, नहेम्या, पारस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H783