mr_tw/bible/kt/zealous.md

3.3 KiB

आवेश, आवेशी

व्याख्या:

"आवेश" आणि "आवेशी" या शब्दांचा संदर्भ एखाद्या व्यक्तीचे किंवा कल्पनेचे समर्थन करण्यासाठी अत्यंत समर्पित असणे.

  • अवेशामध्ये मजबूत इच्छा असणे आणि चांगल्या कारणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या कृती ह्यांचा समावेश होतो. हे सहसा अशा व्यक्तीचे वर्णन करण्याकरिता वापरले जाते, जो देवाची आज्ञा पाळतो आणि इतरांनासुद्धा ती पाळण्यास शिकवतो.
  • आवेशी असणे ह्यामध्ये काहीतरी करण्यासाठी प्रखर प्रयत्न करणे आणि त्या प्रयत्नामध्ये टिकून राहणे ह्याचा समावेश होतो.
  • "देवाचा आवेश" किंवा "यहोवाचा आवेश" या शब्दांचा संदर्भ त्याच्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी किंवा न्याय मिळवण्याकरता देवाच्या सशक्त, निर्णायक कृती ह्याच्या संबंधात येतो.

भाषांतर सूचना

  • "आवेशी असणे" ह्याचे भाषांतर, "कसून मेहनत करणे" किंवा "प्रखर प्रयत्न करणे" असे केले जाऊ शकते.
  • "आवेशी" या शब्दाचे भाषांतर "उत्साही भक्ती" किंवा "उत्सुक निर्धार" किंवा "धार्मिक उत्साह" असेही केले जाऊ शकते.
  • "तुझ्या घराबद्दलचा आवेश" या वाक्यांशाचे भाषांतर "तुझ्या मंदिराचा जोरदार सन्मान करणे" किंवा "तुझ्या घराची काळजी घेण्याची तीव्र इच्छा" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H7065, H7068, G2205, G2206, G2207, G6041