mr_tw/bible/kt/son.md

10 KiB
Raw Permalink Blame History

पुत्र, मुले

व्याख्या:

पुरुश आणि स्त्रीच्या नर संततीला त्याच्या संपूर्ण जीवनभरासाठी त्यांचा "मुलगा" म्हटले जाते. त्याला त्या मनुष्याचा मुलगा आणि त्या स्त्रीचा मुलगा असेही म्हटले जाते. "दत्तक पुत्र" एक पुरुष आहे, ज्याला मुलगा बनण्यासाठी कायदेशीररित्या त्याच्या जागी ठेवले जाते.

  • पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळदा लाक्षणिक पद्धतीने "पुत्र" हा शब्द पुरुष वंशजांसाठी वापरण्यात येतो, जसे की नातू किंवा पणतू.
  • "पुत्र" हा शब्द एखाद्या मुलाला किंवा व्यक्तीला एक प्रेमळ रूपक म्हणून देखील वापरला जाऊ शकतो, जो बोलणाऱ्यांपेक्षा लहान आहे.
  • ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांचा संदर्भ देण्यासाठी नव्या करारात काहीवेळा "देवाचे पुत्र" हा शब्द वापरला आहे.
  • देवाने इस्राएलाला त्याचा "ज्येष्ठ पुत्र" असे म्हंटले. यावरून असे सूचित होते की देवाने इस्राएल राष्ट्राची त्याचे विशेष निवडलेले लोक म्हणून निवड केली. त्यांच्यामार्फत असे झाले आहे की उद्धाराचा आणि तारणाचा देवाचा संदेश आला, परिणामी इतर अनेक लोक त्यांची आध्यात्मिक मुले झालीत.
  • "चा मुलगा" या शब्दाचा बहुधा लाक्षणिक अर्थ "त्या व्यक्तीची स्वाभाविक वैशिष्ट्ये दाखवणारा" हा आहे. याचे उदाहरण म्हणजे "प्रकाशाचे मुलगे," "अवज्ञाचे पुत्र", "शांतीचा पुत्र" आणि "मेघगर्जनाचा पुत्र."
  • "चा पुत्र" हा शब्द एखाद्या व्यक्तीचे वडील कोण आहे हे सांगण्यासाठी देखील वापरला जातो. या वाक्यांशाचा उपयोग वंशावळी सांगण्यासाठी आणि अनेक इतर ठिकाणी केला जातो.
  • "चा मुलगा' हा शब्दप्रयोग त्याच्या वडिलांच्या नावाबरोबर जोडून ज्या लोकांची नावे एकसारखी आहेत, त्या लोकांच्यात फरक दाखविण्यासाठी त्याचा उपयोग वारंवार केला जातो. उदाहरणार्थ, 1 राजा 4 मध्ये "सादोकचा मुलगा अजऱ्या" आणि "नाथानचा मुलगा अजऱ्या" आणि 2 राजा 15 मध्ये "अमस्याच्या पुत्रा अजऱ्या" हे तीन वेगवेगळे पुरुष आहेत.

भाषांतर सूचना

  • या शब्दाच्या अधिकतर घटनांमध्ये, पुत्र याला संदर्भित करण्याच्या भाषेत त्याचे शब्दशः "मुलगा" हे भाषांतर करणे सर्वोत्तम आहे.
  • "देवाचा पुत्र" या शब्दाचे भाषांतर करताना, "मुलगा" यासाठी प्रकल्पाच्या भाषेतील सामान्य संज्ञा वापरली पाहिजे.
  • प्रत्यक्ष मुलाऐवजी एका वंशजाचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो, तेव्हा "वंश" हा शब्द वापरला जाऊ शकतो, जसे की येशूच्या संदर्भात सांगताना, "दाविदाच्या वंशातून" किंवा वंशावळी सांगताना कधी कधी "मुलगा" ह्याचा संदर्भ देताना तो पुरुष वंशज आहे, परंतु तो प्रत्यक्षामध्ये त्याचा मुलगा नसतो.
  • कधीकधी "पुत्र" हे "मुले" म्हणून भाषांतर केले जाऊ शकतात, जेव्हा दोघांचा पुरुष आणि महिलांचा संदर्भ दिला जात आहे. उदाहरणार्थ, "देवाचा पुत्र" याचे भाषांतर "देवाची मुले" असे होऊ शकते कारण या अभिव्यक्तिमध्ये मुली आणि स्त्रिया यांचा समावेश आहे.
  • "चा पुत्र" या शब्दाच्या अलंकारिक अभिव्यक्ती "कोणीतरी ज्याच्याकडे त्याची वैशिष्ठे आहेत" किंवा "कोणीतरी जो त्याच्यासारखा आहे" किंवा "कोणीतरी ज्याच्या जवळ आहे" किंवा "असे कोणीतरी जो त्याच्यासारखा वागतो" अशा भाषांतरित केल्या जाऊ शकतात.

(हे सुद्धा पहा: अजऱ्या, वंश, जेष्ठ, देवाचा पुत्र देवाची मुले

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 04:08 देवाने अब्रामाला पुन्हा दर्शन देऊन म्हटले की त्याला पुत्र होईल व त्याची संतती आकाशातील ताऱ्यांप्रमाणे होईल.
  • 04:09 देव बोलला, “तुला तुझ्याच पोटचा पुत्र होईल.”
  • 05:05 एका वर्षानंतर, अब्राहाम 100 वर्षाचा व सारा 90 वर्षाची असतांना सारेने अब्राहामाच्या पुत्राला जन्म दिला.
  • 05:08 जेंव्हा ते होमार्पणाच्या ठिकाणी जेंव्हा पोहोचले तेंव्हा अब्राहामाने आपला पुत्र इसहाक यास बांधले व वेदीवर ठेविले. तो आपल्या पुत्राला ठार मारणार इतक्यात देव बोलला, “थांब! मुलास इजा करु नकोस! आता मला कळले की तु माझी भिती बाळगतोस कारण तु आपला पुत्र माझ्यापासून राखून ठेवला नाही.”
  • 09:07 जेंव्हा तिने त्या बाळास पाहिले, तेंव्हा तिने त्यास आपला पुत्र बनविले.
  • 11:06 देवाने मिसरातील प्रत्येक प्रथम जन्मलेल्यांस जीवे मारले.
  • 18:01 ब-याच वर्षानंतर, दाविद मरण पावला आणि त्याचा पुत्र शलमोन हा इस्त्राएलवर राज्य करु लागला.
  • 26:04 ‘‘हा योसेफाचा पुत्र ना? ते म्हणू लागले.

Strong's

  • Strong's: H1060, H1121, H1123, H1248, H3173, H3206, H3211, H4497, H5209, H5220, G3816, G5043, G5207