mr_tw/bible/kt/savior.md

3.2 KiB

तारणारा, वाचवणारा

तथ्य:

"तारणारा" या शब्दाचा संदर्भ, एखाद्या व्यक्तीशी आहे, जो धोक्यातून वाचवतो किंवा सोडवतो. ह्याचा संदर्भ एखाद्या व्यक्तीशी आहे, जो इतरांना सामर्थ्य देतो किंवा त्यांना प्रदान करतो.

  • जुन्या करारामध्ये, देवाला इस्राएलाचा तारणारा असे संदर्भित केले आहे, कारण त्याने बऱ्याचदा त्यांना त्यांच्या शत्रूंपासून सोडवले आहे, त्यांना सामर्थ्य दिले, आणि त्यांना जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी प्रदान केल्या.
  • नवीन करारामध्ये, "तारणारा" या शब्दाचा उपयोग येशुबद्दलचे वर्णन किंवा शीर्षक म्हणून केला आहे, कारण तो लोकांना त्यांच्या पापाबद्दल मिळणाऱ्या सार्वकालिक शिक्षेपासून वाचवतो. तो त्यांना पापाद्वारे नियंत्रित केले जाण्यापासून सुद्धा वाचवतो.

भाषांतर सूचना

शक्य असल्यास, "तारणारा" या शब्दाचे भाषांतर, "वाचवणे" आणि " उद्धार" ह्याच्याशी संबंधित शब्दाने केले जाऊ शकते.

  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "एक जो वाचवतो" किंवा "देव, जो वाचवतो" किंवा "जो धोक्यातून सोडवतो" किंवा "जो शत्रूंपासून सोडवतो" किंवा "येशू, एक जो (लोकांना) पापापासून सोडवतो" ह्यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: सोडवणे, येशू, वाचवणे, तारणारा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3467, G4990