mr_tw/bible/kt/ransom.md

4.2 KiB

खंडणी, खंडणी भरून मुक्त झालेला

व्याख्या:

"खंडणी" हा शब्द एखादा मनुष्य ज्याला बंदी केलेले आहे, त्याला सोडवण्यासाठी मागणी केलेल्या किंवा भरलेल्या एकूण पैश्याच्या किंवा मोबदल्याच्या संदर्भात येतो.

  • क्रियापद म्हणून, "खंडणी" ह्याचा अर्थ असा एखादा ज्याला पकडले, गुलाम केले, किंवा तुरुंगात टाकण्यात आले आहे अशा व्यक्तीला सोडवण्यासाठी मोबदला देणे किंवा आत्म-समर्पणाने काहीतरी करणे असा होतो. "परत विकत घेणे" या शब्दाचा हा अर्थ "सोडवणे" या शब्दाच्या अर्थासारख्याच आहे.
  • पापमय लोकांना त्यांच्या पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी येशूने स्वतःला मारण्याची परवानगी दिली. पवित्र शास्त्रामध्ये, लोकांच्या पापांच्या शिक्षेची भरपाई करून त्याच्या लोकांना परत विकत घेण्याच्या देवाच्या कृत्याला "मुक्ती" असे म्हणतात.

भाषांतर सूचना

  • "खंडणी" या शब्दाचे भाषांतर "सोडण्यासाठी मोबदला देणे" किंवा "मुक्त करण्याची किंमत देणे" किंवा "परत विकत घेणे" असे केले जाऊ शकते.
  • "खंडणी भरणे" या वाक्यांशाचे भाषांतर "(स्वातंत्र्याची) किंमत भरणे" किंवा "(लोकांना मुक्त करण्यासाठी) दंड भरणे" किंवा "आवश्यक असलेली रक्कम देणे" असे केले जाऊ शकते.
  • "खंडणी" या नाम चे भाषांतर "परत विकत घेतलेले" किंवा "दंड भरलेले" किंवा "किंमत भरलेली" (लोक किंवा जमीन परत विकत घेण्यासाठी किंवा मुक्त करण्यासाठी) म्हणून केले जाऊ शकते.
  • "खंडणी" आणि "मुक्ती" या शब्दाचा इंग्रजीमध्ये समान अर्थ आहे परंतु काहीवेळा तो वेगळ्या पद्धतीने वापरला जातो. * इतर भाषेमध्ये ह्यासाठी कदाचित फक्त एकच शब्द असू शकतो.
  • "पश्चात्ताप" या शब्दापासून याचे भाषांतर वेगळे असेल याची खात्री करा.

(हे सुद्धा पहा: प्रायश्चित्त, सोडवणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1350, H3724, H6299, H6306, G487, G3083