mr_tw/bible/kt/pharisee.md

2.8 KiB

परुशी, परुश्यांच्या

तथ्य:

येशूच्या काळात, परुशी हा महत्वाचा, शक्तिशाली यहुदी धार्मिक लोकांचा समूह होता.

  • त्यांच्यापैकी अनेकजण हे मध्यमवर्गीय व्यावसायिक होते आणि त्यातील काहीजण हे याजक सुद्धा होते.
  • सर्व यहुदी पुढाऱ्यांपैकी परुशी हे मोषेचे नियमशास्त्र पाळण्यात आणि इतर यहुदी नियम आणि परंपरा पाळण्यात सर्वात कडक होते.
  • यहुदी लोकांना त्यांच्या सभोवती असणाऱ्या परराष्ट्रीयांच्या प्रभावापासून वेगळे ठेवण्याच्या संबंधात ते लोक अतिशय काळजी घेत होते. "परुशी" हा शब्द "वेगळे करणे" या शब्दापासून आला आहे.
  • परुशी लोक मेल्यानंतरच्या जीवनावर विश्वास ठेवत; आणि ते देवदूतांच्या आणि इतर आत्मिक अस्तित्वाच्या असण्यावर सुद्धा विश्वास ठेवत होते.
  • परुशी आणि सदुकी लोकांनी, येशू आणि आद्य ख्रिस्ती लोकांचा सक्रियपणे विरोध केला.

(हे सुद्धा पहा: परिषद(मंडळी), यहुदी पुढारी, नियमशास्त्र, सदुकी))

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: G5330