mr_tw/bible/kt/perish.md

2.9 KiB

नाश होणे, नाश झाला, नाश होत आहे, नाश होणारे (नाशवंत)

व्याख्या:

"नाश होणे" या शब्दाचा अर्थ मरणे किंवा नष्ट होणे असा होतो, आणि सहसा हा एखाद्या हिंसेचा किंवा आपत्तीचा परिणाम असतो. पवित्र शास्त्रामध्ये, या शब्दाचा सार्वकाळासाठी नरकामध्ये शिक्षा देणे असा विशेषकरून अर्थ आहे.

  • ज्या लोकांचा "नाश होत आहे" त्यांना नार्कासाठी योजून ठेवलेले आहे, कारण त्यांनी त्यांच्या तारणासाठी येशूवर विश्वास ठेवण्यास नकार दिला.
  • योहान 3:16 असे शिकवते की, "नाश होणे" ह्याचा अर्थ सार्वकाळासाठी स्वर्गामध्ये राहू न शकणे असा होतो.

भाषांतर सूचना:

  • संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "सार्वकाळासाठी मरणे" किंवा 'नरकात शिक्षा झालेली असणे" किंवा "नष्ट झालेले असणे" यांचा समावेश आहे.
  • "नाश होणे" या शब्दाच्या भाषांतराचा अर्थ सार्वकाळासाठी नरकात राहणे असा होतो आणि त्याचा अर्थ फक्त "अस्तित्व थांबणे" असा होत नाही, ह्याची खात्री करा.

(हे सुद्धा पहा: मृत्यू, अनंतकाळ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H6, H7, H8, H1478, H1820, H5486, H5595, H6544, H8045, G599, G622, G684, G853, G1311, G2704, G4881, G5356