mr_tw/bible/kt/passover.md

5.9 KiB

वल्हांडण

तथ्य:

"वल्हांडण" हा सण यहुदी लोक, देवाने मिसराच्या गुलामगिरीतून आपल्या पूर्वजांना, इस्राएली लोकांना कसे सोडवले हे लक्षात ठेवण्याकरता, दरवर्षी साजरा करत असलेल्या धार्मिक उत्सवाचे नाव आहे.

  • या उत्सवाचे नाव या तथ्यांवरून आले आहे की, जेंव्हा त्याने मिसरी लोकांच्या प्रथम जन्मलेल्या मुलांना मारून टाकले, तेंव्हा देवाने इस्राएलांच्या घरांना "पार केले" आणि त्यांच्या मुलांना मारले नाही.
  • वल्हांडणाच्या उत्सवाच्या विशेष जेवणात, एक परिपूर्ण कोकरा, ज्याला त्यांनी ठार केले होते आणि भाजलेले होते, त्याचबरोबर खमीर न घातलेल्या भाकारींचा समावेश होता. हे खाद्यपदार्थ त्यांना त्या जेवणाची आठवण करून देतात, जे त्यांनी मिसर मधून बाहेर पडण्यापूर्वी खाल्ले होते.
  • देवाने कसे त्यांच्या "घरांना पार" केले आणि कसे त्यांची मिसरच्या गुलामगिरीतून सुटका केली, ह्याची आठवण ठेवण्याकरिता आणि ते साजरा कारण्याकरिता देवाने इस्राएली लोकांना हे अन्न दरवर्षी खाण्याची आज्ञा केली.

भाषांतर सूचना

  • "वल्हांडण" या शब्दाचे भाषांतर "पार करणे" आणि "वरून जाणे" हे दोन शब्द एकत्र करून किंवा समान अर्थाच्या दुसऱ्या शब्दांना एकत्रित करून केले जाऊ शकते.
  • जर या उत्सवाच्या नावाचा स्पष्ट संबंध, देवाच्या दूताने इस्राएली लोकांच्या घराला पार केले आणि त्यांच्या मुलांना वाचवले, हे स्पष्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाशी सुसंगत असेल, तर हे उपयुक्त ठरेल.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 12:14 देवाने इस्राएलाला मिसरी लोकांवर कसा विजय दिला व त्यांची गुलामगिरीपासून कशी सुटका केली याचे स्मरण त्यांना राहावे म्हणून देवाने इस्राएलास दरवर्षी वल्हांडण सण साजरा करण्याची आज्ञा दिली.
  • 38:01 दरवर्षी, यहूदी वल्हांडण सण साजरा करत असत. देवाने मिसर देशातील गुलामगिरीतून शेकडोवर्षापुर्वी त्यांच्या पुर्वजांची कशी सुटका केली, याचा आनंद साजरा करण्यासाठी यहूदी लोक हा सण पाळत.
  • 38:04 यरुशलेमध्ये, येशूने आपल्या शिष्यांसह वल्हांडण सण साजरा केला.
  • 48:09 जेव्हा देवाने ते रक्त पाहिले, तेव्हा त्यांचे घर ओलांडून तो गेला व प्रथम जन्मलेल्या पुत्रांस त्याने मारले नाही. या घटनेस वल्हांडण म्हणतात.
  • 48:10 येशू ख्रिस्त हाच आमच्या वल्हांडणाचा कोकरा आहे. तो परिपुर्ण व निर्दोष होता आणि वल्हांडणाच्या सणाच्या समयी वधला गेला होता.

Strong's

  • Strong's: H6453, G3957