mr_tw/bible/kt/name.md

5.0 KiB

नाव, नावे, नावाचा

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये, "नाव" या शब्दाचा उपयोग अनेक लाक्षणिक मार्गांनी केला जातो.

  • काही संदर्भामध्ये, "नाव" या शब्दाचा संदर्भ व्यक्तीच्या नावलौकीकाशी आहे, जसे की, "आपण स्वतःसाठी एक नाव बनवूया."
  • "नाव" या शब्दाचा संदर्भ एखाद्या गोष्टीच्या स्मृतीशी देखील येतो. उदाहरणार्थ, "मूर्तींचे नाव काढून टाका" ह्याचा अर्थ त्या मूर्तींचा नाश करा म्हणजे इथून पुढे त्यांची आठवण राहणार नाही किंवा उपासना होणार नाही असा होतो.
  • "देवाच्या नावाने" बोलणे म्हणजे त्याचा सामर्थ्याने आणि अधिकाराने, किंवा त्याचा प्रतिनिधी म्हणून बोलणे.
  • एखाद्याचे "नाव" त्या संपूर्ण व्यक्तीला संदर्भीत करते, जसे की, "स्वर्गाच्या खाली आणखी कोणाचे नाव दिलेले नाही, ज्याच्यापासून आमचे तारण व्हावे" (पाहा: लक्षणा

भाषांतर सूचना

  • "त्याचे चांगले नाव" या शब्दाचे भाषांतर "त्याचा उत्तम नावलौकिक" असे केले जाऊ शकते.
  • "च्या नावाने" काहीतरी करणे ह्याचे भाषांतर एखाद्या व्यक्ती "च्या अधिकाराने" किंवा "ची परवानगी घेऊन" किंवा "चा प्रतिनिधी म्हणून" असे केले जाऊ शकते.
  • "स्वतःसाठी नाव बनवा" या अभिव्यक्तीचे भाषांतर "अनेक लोकांना आपल्याबद्दल जाणून घेण्यास भाग पाडणे" किंवा "आपण फार महत्वाचे आहोत हे लोकांना विचार करावयास लावणे" असे केले जाऊ शकते.
  • "त्याच्या नावाला हाक द्या" या अभिव्यक्तीचे भाषांतर "त्याला नाव" किंवा "त्याला नाव द्या" असे केले जाऊ शकते.
  • "जे तुझ्या नावावर प्रेम करतात" या वाक्यांशाचे भाषांतर "जे तुझ्यावर प्रेम करतात" असे केले जाऊ शकते.
  • "मूर्तींचे नाव काढून टाका" या वाक्यांशाचे भाषांतर "मूर्तिपूजक मूर्तींपासून मुक्त व्हा जेणेकरून त्यांचे स्मरणही होणार नाही" किंवा "लोकांनी खोट्या देवाची उपासना करण्यापासून थांबण्यास कारणीभूत व्हा" किंवा "सर्व मूर्तींचा नाश करा, म्हणजे लोक त्यांचा पुढे विचारही करणार नाहीत" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: बोलावणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5344, H7121, H7761, H8034, H8036, G2564, G3686, G3687, G5122