mr_tw/bible/kt/minister.md

3.6 KiB

ची सेवा, सेवा

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये, "सेवा" हा शब्द, इतरांना देवाबद्दल शिकवून आणि त्यांच्या आध्यात्मिक गरजांची काळजी घेण्याविषयी संदर्भित करतो.

  • जुन्या करारामध्ये, याजक मंदिरामध्ये, देवाला बलिदान अर्पण करून त्याची "सेवा" करत.
  • त्यांच्या "सेवेमध्ये" मंदिराची देखभाल करणे आणि लोकांच्या वतीने देवाला प्रार्थना सादर करणे ह्यांचा समावेश होता.
  • लोकांची "सेवा" करण्याच्या कार्यामध्ये, त्यांना देवाच्या वचनाबद्दल शिकवून त्यांना आत्मिकरीत्या खाऊ घालणे ह्यांचा समावेश होतो.
  • ह्याचा संदर्भ लोकांची भौतीकरीत्या सेवा करण्याशी सुद्धा आहे, जसे की, आजारी लोकांची काळजी घेणे, आणि गरिबांना अन्न पुरवणे.

भाषांतर सूचना

  • लोकांची सेवा करण्याच्या संदर्भात, "ची सेवा करणे" ह्याचे भाषांतर "सेवा करणे" किंवा "ची काळजी घेणे" किंवा "च्या गरजा भागवणे" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा मंदिराची सेवा करण्याच्या संदर्भ येतो तेंव्हा, "सेवा" या शब्दाचे भाषांतर "मंदिरामध्ये देवाची सेवा करणे" किंवा "लोकांच्यासाठी देवाला बलिदान अर्पण करणे" असे केले जाऊ शकते.
  • लोकांची सेवा करण्याच्या संदर्भात, "ची सेवा करणे" ह्याचे भाषांतर "सेवा करणे" किंवा "ची काळजी घेणे" किंवा "च्या गरजा भागवणे" असे केले जाऊ शकते.
  • "ची सेवा करणे" या वाक्यांशाचे भाषांतर "ची काळजी घेणे" किंवा "मदत करणे" किंवा "मदत केली" असे देखील होऊ शकते.

(हे सुद्धा पहा: सेवा, बलिदान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H6399, H8120, H8334, H8335, G1247, G1248, G1249, G2023, G2038, G2418, G3008, G3009, G3010, G3011, G3930, G5256, G5257, G5524