mr_tw/bible/kt/love.md

14 KiB

प्रीती (प्रेम), आवडणे, प्रेमळ, प्रीती केली

व्याख्या:

दुस-या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे त्या व्यक्तीची काळजी घेणे आणि त्याला लाभ होईल अशा गोष्टी करणे. "प्रेम" साठी वेगवेगळे अर्थ आहेत काही भाषा भिन्न शब्द वापरुन ते व्यक्त करू शकतात:

  1. देवाकडून येणारे प्रेम हे त्याचा स्वतःला लाभ मिळाला नाही तरी इतरांच्या भल्यावर केंद्रित असणारे आहे. या प्रकारचे प्रेम इतरांबद्दल त्यांनी काहीही केले तरी काळजी घेते. देव स्वतःच प्रीती आहे आणि तो खऱ्या प्रेमाचा स्त्रोत आहे.
  • पाप आणि मृत्यूपासून आपली सुटका करण्यासाठी येशूने आपले जीवन अर्पण करून या प्रकारचे प्रेम दाखवले. त्याने आपल्या अनुयायांना देखील निस्वार्थ प्रीती करण्यास शिकवले.
  • जेव्हा लोक अशा प्रकारच्या प्रेमाने इतरांवर प्रेम करतात, तेव्हा ते अशा प्रकारे कार्य करतात ज्यामुळे ते इतरांच्या उत्कर्षास कारणीभूत ठरतील. अशा प्रकारच्या प्रेमामध्ये विशेषत: इतरांना क्षमा करणे समाविष्ट असते.
  • ULB भाषांतरामध्ये, "प्रेम" हा शब्द जोपर्यंत भाषांतराच्या टिपण्णीमध्ये वेगळा अर्थ दर्शवित नाही तोपर्यंत अशाच प्रकारच्या निस्वार्थ प्रेमाचा उल्लेख करतो.
  1. नवीन करारात आणखी एक शब्द बंधुप्रिती, किंवा मित्रांबद्दल प्रेम, किंवा कौटुंबिक सदस्यांबद्दलचे प्रेम, यांचादेखील संदर्भ दिला आहे.
  • ही संज्ञा मित्र किंवा नातेवाईक यांच्या दरम्यानचे नैसर्गिक मानवी प्रेम संदर्भित करते.
  • हा शब्द अशा संदर्भांमध्ये देखील वापरला जाऊ शकतो जसे की, "एखाद्या मेजवानीतील सर्वात महत्त्वाच्या जागांवर बसायला त्यांना आवडते." याचा अर्थ असा आहे की ते "त्यांना खूप आवडते" किंवा "ते करण्याची त्यांची इच्छा आहे."
  1. "प्रीती" हा शब्द एक स्त्री आणि पुरुष यांच्यातील कल्पनाविश्वातील प्रेमाच्या संदर्भात देखील वापरला जातो.

  2. लाक्षणिक अर्थाने वापरण्यात येणाऱ्या शब्द प्रयोगामध्ये "मला याकोब आवडतो, परंतु मी एसावचा द्वेष केला आहे," इथे "आवडणे" या शब्दाचा संदर्भ देवाने याकोबाला त्याच्याशी असणाऱ्या संबंधाच्या करारासाठी निवडण्याशी आहे. याचे भाषांतर "निवडलेला" असेही होऊ शकते. जरी एसावाला देखील देवाने आशीर्वादित केले असले तरी त्याला करारात सामील होण्याचे विशेषाधिकार देण्यात आले नाही. "द्वेष केला" या शब्दाचा लाक्षणिक अर्थ "नाकारले" किंवा "निवडले नाही" असा होतो.

भाषांतर सूचना

  • भाषांतराच्या टिपण्णीमध्ये च्या बदल्यात जोपर्यंत दर्शवित नाही, तोपर्यंत ULB भाषांतरामध्ये, "प्रेम" या शब्दाचा संदर्भ अशाच प्रकारच्या निस्वार्थ प्रेमाशी आहे.
  • काही भाषांमध्ये देवाच्या निःस्वार्थ, बलिदान देणाऱ्या प्रेमाच्या शब्दांबद्दल विशेष शब्द असू शकतो. भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "समर्पित, निष्ठावान काळजी करणारा" किंवा "निःस्वार्थपणे काळजी घेणारा" किंवा "देवाचे प्रेम" अशा शब्दांचा समावेश होतो. देवाच्या प्रीतीत याचे भाषांतर करण्यासाठी वापरलेल्या शब्दात इतरांच्या फायद्यासाठी त्यांनी काहीही केले तरी स्वतःचे हित सोडून त्यांच्यावर प्रेम करणे या शब्दांचा समावेश होईल हे सुनिश्चित करा.
  • कधीकधी इंग्रजी शब्द "प्रेम" हा शब्द लोकांना त्यांच्या मित्राबद्दल आणि कौटुंबिक सदस्यांबद्दल असणाऱ्या तीव्र काळजीचे वर्णन करतो. काही भाषा या शब्दाचे किंवा वाक्यांशालाचे "खूप आवडते" किंवा "एखाद्याची काळजी करणे" किंवा "एखाद्या बद्दल जबरदस्त स्नेहभाव असणे" असे भाषांतर करतात.
  • ज्या संदर्भात "प्रेम" या शब्दाचा प्रयोग एखाद्याला जबरदस्त प्राधान्य देण्याबद्दल केला असेल, तर त्याचे भाषांतर "अति प्राधान्य दिलेला" किंवा "खूप आवडलेला" किंवा "खूप इच्छा असलेला" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषेमध्ये पती आणि पत्नीच्या कल्पनाविश्वातील किंवा लैंगिक प्रेमाबद्दलच्या संदर्भासाठी एक वेगळा शब्द असू शकतो.
  • अनेक भाषांमध्ये कृतीमधून "प्रेम" व्यक्त करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, ते "प्रेम सहनशील आहे, प्रेम दयाळू आहे" असे भाषांतर करू शकतात, जसे "एखादा व्यक्ती एखाद्यावर प्रेम करतो, तेव्हा तो त्याच्याशी सहनशीलतेने वागतो आणि त्याच्याशी दयाळूपणे वागतो."

(हे सुद्धा पहा: करार, मृत्यू, यज्ञ, जतन, पाप

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 27:02 त्याने म्हटले,‘‘तू आपला देव याजवर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने व संपूर्ण शक्तिने प्रीती कर. आणि जशी आपणावर तशी शेजा-यावर प्रीति कर’’
  • 33:08 ‘‘काटेरी जमीन म्हणजे जो देवाचे वचन ऐकतो, परंतू कालांतराने संसाराची चिंता, श्रीमंती आणि जगिक सुख यामुळे त्याचे देवावरील प्रेम कमी होत जाते.
  • 36:05 पेत्र बोलत असतानाच, एका तेजस्वी मेघाने येऊन त्यांना वेढिले व मेघातून अशी वाणी झाली की, ‘‘हा माझा पुत्र आहे याच्यावर मी प्रीती करतो.
  • 39:10 सत्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण माझे ऐकतो’’
  • 47:01 तिचे देवावर प्रेम होते व ती देवाची भक्ती करणारी होती.
  • 48:01 देवाने जेव्हा सृष्टी बनविली तेव्हा सर्वकाही परिपूर्ण होते. तेथे पाप नव्हते. आदाम आणि हव्वा एकमेकांवर प्रेम करत व त्यांचे देवावर प्रेम होते.
  • 49:03 त्याने शिकविले की आपण जशी आपल्यावर प्रीती करतो तशी आपण दुस-यांवरही प्रीती केली पाहिजे.
  • 49:04 त्याने असे सुद्धा शिकवले की आपण आपल्या इतर सर्व वस्तूपेक्षा, संपत्तीपेक्षा देवावर अधिक प्रिती करायला पाहिजे.
  • 49:07 येशूने शिकवले की देव पाप्यांवर फार प्रेम करतो.
  • 49:09 परंतु देवाने जगातील प्रत्येक मनुष्यावर एवढी प्रिती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याजवर विश्वास ठेवितो येशू त्याला त्याच्या पापांची शिक्षा देणार नाही, पण देवाबरोबर सदासर्वकाळ राहील.
  • 49:13 देव आपणांवर प्रिती करतो व आपण येशूवर विश्वास ठेवावा अशी त्याची इच्छा आहे, अशासाठी की त्याने आम्हाबरोबर जवळचे नातेसंबंध जोडावे.

Strong's

  • Strong's: H157, H158, H159, H160, H2245, H2617, H2836, H3039, H4261, H5689, H5690, H5691, H7355, H7356, H7453, H7474, G25, G26, G5360, G5361, G5362, G5363, G5365, G5367, G5368, G5369, G5377, G5381, G5382, G5383, G5388