mr_tw/bible/kt/lord.md

12 KiB
Raw Permalink Blame History

प्रभु, परमेश्वर, देव, मालक (धनी), स्वामी,

व्याख्या:

"प्रभु" या शब्दाचा संदर्भ अशा व्यक्तीसाठी वापरला जातो ज्याचा इतर लोकांवर मालकी हक्क किंवा अधिकार असतो.

  • जेंव्हा हा शब्द येशुसाठी संबोधण्यात आला किंवा गुलामांचा मालक असलेल्या कोणास संदर्भित करण्यासाठी वापरण्यात आला तेंव्हा या शब्दाचे कधीकधी "गुरु" असे भाषांतर केले गेले.
  • काही इंग्रजी आवृत्त्यांमधे हा अनुवाद "सर (प्रभु)" असा होतो जेंव्हा कोणी एक उच्च पद असणाऱ्या व्यक्तीला नम्रपणे निवेदन करीत असतो.

जेव्हा "लॉर्ड" मोठ्या स्वरुपाचे असते, तेव्हा तो देवाचे संदर्भ दर्शविणारे एक शिर्षक असते. (नोंद घ्या, तथापि, जेव्हा ती एखाद्याला संबोधित करण्याचा एक प्रकार म्हणून वापरली जाते किंवा वाक्यच्या सुरूवातीला उद्भवते तेव्हा तेथे मोठ्या अक्षरांचा उपयोग केला जाऊ शकतो आणि त्याचा अर्थ "गुरु" किंवा "स्वामी" असा होतो.)

  • जुना करारामध्ये, या शब्दाचा उपयोग "प्रभु परमेश्वर सर्वशक्तिमान" किंवा "यहोवा देव" किंवा "यहोवा आमचा प्रभू" या अभिव्यक्ती साठी केला गेला.
  • नवीन करारात, प्रेषितांनी "प्रभु येशू" आणि "प्रभु येशू ख्रिस्त" असे शब्दप्रयोग वापरला ज्याने हा संदेश दिला की ख्रिस्त हा देव आहे.
  • नवीन करारांमध्ये "प्रभु" हा शब्द फक्त ईश्वराचा प्रत्यक्ष संदर्भ म्हणूनच वापरला जातो, विशेषत: जुन्या करारांमधील मधील नमुना म्हणून सांगताना. उदाहरणार्थ, जुना कराराच्या मजकूरात "धन्य आहे जो यहोवाच्या नावाने येतो" आणि नवीन कराराच्या मजकूरात "प्रभूच्या नावाने येणारा धन्यावाडीत आहे" असा उल्लेख येतो.
  • ULB आणि UDB भाषांतरामध्ये, "प्रभु" हे शीर्षक केवळ हिब्रू आणि ग्रीक शब्दांचे भाषांतर करण्यासाठी वापरले जाते, ज्याचा अर्थ "प्रभु" आहे. तो देवाच्या नावाचा (यहोवाच्या) भाषांतराच्या रूपात वापरला जात नाही, जसे की अनेक भाषांतरांमध्ये केले जाते.
  • काही भाषा "प्रभु" या शब्दाचे भाषांतर "स्वामी" किंवा "शासक" म्हणून किंवा अन्य काही संज्ञा वापरतात ज्याचे संप्रेषण मालकी किंवा सर्वोच्च शासन असे होईल.
  • योग्य संदर्भांमध्ये, बऱ्याच भाषांतरांमध्ये वाचकांना हे स्पष्ट करण्यासाठी की हे देवाचा संदर्भ देणारा शीर्षक आहे हे पद प्रथम अक्षरात शब्दांकित करण्यात आले आहे.
  • नवीन करारात काही ठिकाणी जेथे जुन्या करारांमधील उदाहरण आहे त्या ठिकाणी तेथे देवाचा संदर्भ आहे हे स्पष्ट करण्यासाठी "प्रभु परमेश्वर" हा शब्द वापरला जाऊ शकतो.

भाषांतर सूचना

  • हा शब्द "धन्याच्या" बरोबरीने भाषांतरित केला जाऊ शकतो जेव्हा तो गुलामांचा मालक असलेल्या व्यक्तीस सूचित करतो. या शब्दाचा उपयोग एखाद्या नोकराकडून त्याच्या मालकाला संबोधित करण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो.
  • जेव्हा तो येशूस सूचित करतो, जर संदर्भ दर्शवितो की वक्ता त्याला धार्मिक गुरु म्हणून पाहतो, तर भाषांतरामध्ये त्याला आदर दर्शवणाऱ्या धार्मिक गुरुच्या नावाने संबोधित केले जाऊ शकते, जसे की "स्वामी."
  • जर एखादा व्यक्ती जो येशूला ओळखत नाही तो संबोधित करत असेल, तर "प्रभु" या शब्दाचे भाषांतर आदरणीय स्वरूपात भाषांतरित केले जाऊ शकते जसे की "स्वामी." या भाषांतराचा वापर इतर संदर्भासाठी सुद्धा केला जाऊ शकतो, ज्यामध्ये ज्या व्यक्तीला बोलावले आहे त्या व्यक्तीसाठी नम्र स्वरूपाचा उपयोग करतात.
  • देव पिता किंवा येशूचा संदर्भ देताना, जेंव्हा हा शब्द इंग्रजीमध्ये "Lord" (पद प्रथम अक्षरात) असा लिहिलेला असतो तेंव्हा तो एक शीर्षक मानला जातो.

(हे सुद्धा पहा: देव, येशू, शासक, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 25:05 परन्तु येशूने सैतानाला धर्मशास्त्रातूनच उत्तर दिले. तो म्हणला,‘‘देव आपल्या वचनातून आपल्या लोकांना आज्ञा देतो,‘तू आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस.
  • 25:07 येशूने म्हटले,‘‘अरे सैताना, चालता हो! देव आपल्या वचनामध्ये लोकांस आज्ञा करितो, परमेश्वर तुझा देव हयाला नमन कर व केवळ त्याचीच उपसना कर!
  • 26:03 परेमश्वराच्या कृपा प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी’’
  • 27:02 त्याने म्हटले,‘‘तू आपला देव याजवर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने व संपूर्ण शक्तिने प्रीती कर.
  • 31:05 तेंव्हा पेत्र येशूला म्हणला, प्रभुजी, जर आपण आहात, तर मला पाण्यावर चालण्याची आज्ञा द्या.
  • 43:09 परंतु आता तुम्हाला कळू द्या की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे!"
  • 47:03 या दुष्टात्म्याच्या आधारे ती लोकांचे भविष्य सांगत असे, अशा प्रकारे भविष्य सांगून ती आपल्या धन्यासाठी भरपूर मिळकत करुन देत असे.
  • 47:11 पौलाने उत्तर दिले, "प्रभु येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल."

Strong's

  • Strong's: H113, H136, H1167, H1376, H4756, H7980, H8323, G203, G634, G962, G1203, G2962