mr_tw/bible/kt/hypocrite.md

3.3 KiB

ढोंगी, ढोंगीपणा

व्याख्या:

"ढोंगी" या शब्दाचा संदर्भ अशा व्यक्तीशी येतो, जो नीतिमान भासण्यासाठी गोष्टी करतो, पण गुप्तपणे तो दुष्ट पद्धतीने कार्य करत असतो. "ढोंगीपणा" या शब्दाचा संदर्भ वर्तणुकीशी येतो, जे लोकांना तो व्यक्ती नीतिमान आहे असा विचार करावयास लावून फसवते.

  • ढोंगी लोक, चांगल्या गोष्टी करताना आपल्याला लोकांनी बघावे, असे त्यांना वाटते, जेणेकरून लोक असा विचार करतील की हे चांगले लोक आहेत.
  • बऱ्याचदा ढोंगी लोक इतर लोकांवर तीच पापमय कृत्ये करण्याची टीका करतील, जी कृत्ये ते स्वतः करीत आहेत.
  • येशूने परुश्यांना ढोंगी असे म्हंटले, कारण जरी ते विशिष्ठ प्रकारचे कपडे घालत होते, आणि विशिष्ठ अन्न खत होते, तरीही ते लोकांच्याप्रती दयाळू किंवा समान वागत नव्हते.
  • ढोंगी इतर लोकांच्यामधील चुका निदर्शनास आणून देतो, पण स्वतःच्या चुका मात्र कबूल करीत नाही.

भाषांतर सूचना:

  • काही भाषेमध्ये "दु-तोंडी" अशी अभिव्यक्ती आहे, ज्याचा संदर्भ ढोंग्याशी किंवा ढोंगीपणाच्या कृत्यांशी येतो.
  • "ढोंगी" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "फसवणूक" किंवा "तोतया" किंवा "गर्विष्ठ, लबाड मनुष्य" ह्यांचा समावेश होतो.
  • "ढोंगीपणा" या शब्दाचे भाषांतर, "लबाडी" किंवा "खोटी कृत्ये" किंवा "बतावणी" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H120, H2611, H2612, G505, G5272, G5273