mr_tw/bible/names/zechariahot.md

24 lines
3.3 KiB
Markdown

# जखऱ्या (जुना करार)
## तथ्य:
जखऱ्या हा एक संदेष्टा होता, ज्याने पारसाचा राजा दारयावेश पहिला ह्याच्या कारकीर्दीच्या वेळी भविष्यवाणी केली. जुन्या करारातील जखऱ्या नावाच्या पुस्तकात त्याच्या भविष्यवाण्या समाविष्ट आहेत, ज्यामध्ये त्याने निर्वासित झालेल्या लोकांना मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी परत येण्याचे आवाहन केले होते.
* ज्या कालावधीत एज्रा, नहेम्या, जरुब्बाबेल आणि हग्गय जगले, जखऱ्या सुद्धा त्याच कालावधीत जगत होता. जुन्या कराराच्या काळात, मारण्यात आलेल्या शेवटच्या संदेष्ट्यांपैकी एक म्हणून येशूने जखऱ्याचा उल्लेख केला.
* अजून एक जखऱ्या नावाचा मनुष्य, हा दाविदाच्या काळात मंदिराच्या द्वारपाळाचे काम करत होता.
* यहोशाफाट ह्याच्या मुलांपैकी एका मुलाचे नाव जखऱ्या होते, ज्याला त्याचा भाऊ यहोरामने मारून टाकले.
* जखऱ्या हे एका याजकाचे नाव होते, जेंव्हा त्याने इस्राएली लोकांना त्यांच्या मूर्तीची उपासना करण्याबद्दल दोष दिला, तेंव्हा त्यांनी त्याला दग्द्मार केला.
* जखऱ्या राजा हा यराबामचा मुलगा होता आणि त्याला मारून टाकण्याच्या पूर्वी, त्याने इस्राएलावर फक्त सहा महिनेच राज्य केले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [दरयावेश](../names/darius.md), [एज्रा](../names/ezra.md), [यहोशाफाट](../names/jehoshaphat.md), [यराबाम](../names/jeroboam.md), [नहेम्या](../names/nehemiah.md), [जरुब्बाबेल](../names/zerubbabel.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [एज्रा 05:1-2](rc://*/tn/help/ezr/05/01)
* [मत्तय 23:34-36](rc://*/tn/help/mat/23/34)
* [जखऱ्या 01:1-3](rc://*/tn/help/zec/01/01)
Strong's: H2148