mr_tw/bible/names/uriah.md

29 lines
3.0 KiB
Markdown

# उरीया
## तथ्य:
उरीया हा एक नीतिमान मनुष्य, आणि दावीद राजाचा एक उत्तम सैनिक होता. त्याला सहसा "उरीया हित्ती" असे संबोधित केले जाते.
* उरीया ह्याला एक अतिशय सुंदर पत्नी होती तिचे नाव बेथशेबा होते.
* दावीदाने उरीयाच्या पत्नीबरोबर व्यभिचार केला, आणि ती दाविदापासून गर्भवती राहिली.
* हे पाप झाकण्यासाठी, दावीदाने उरीयाला युद्धात मरावयास लावले. नंतर दावीदाने बेथशेबा हिच्याची विवाह केला.
* अजून एक उरीया नावाचा मनुष्य, अहाज राजाच्या काळात याजक होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [अहाज](../names/ahaz.md), [बेथशेबा](../names/bathsheba.md), [दावीद](../names/david.md), [हित्ती](../names/hittite.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 राजे 15:4-6](rc://*/tn/help/1ki/15/04)
* [2 शमुवेल 11:2-3](rc://*/tn/help/2sa/11/02)
* [2 शमुवेल 11:26-27](rc://*/tn/help/2sa/11/26)
* [नहेम्या 03:3-5](rc://*/tn/help/neh/03/03)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* बथशेबाचा पती __उरीया__ हा दाविदाचा शूर योद्धा होता. दाविदाने __उरीयास__ युद्धातून परत बोलावले व आपल्या पत्नी बरोबर राहण्यास सांगितले. परंतु दूसरे सैनिक युद्ध करत असताना आपण घरी जाणे योग्य नव्हे असे समजून त्याने घरी जाण्यास नकार दिला. म्हणून दाविदाने __उरीयास__ परत युद्धामध्ये पाठविले व सेनापतीस सांगितले की त्याने तुंबळ युद्धाच्या ठिकाणी उरीयाची नेमणूक करावी म्हणजे __उरीया__ युद्धात मारला जाईल.
* __उरीया__ मेल्यानंतर दाविदाने बथशेबाशी लग्न केले.
Strong's: H223, G3774