mr_tw/bible/names/thessalonica.md

24 lines
2.9 KiB
Markdown

# थेस्सलनीका, थेस्सलनीकाकर, थेस्सलनीकाकरांस
## तथ्य:
नवीन कराराच्या काळात, थेस्सलनीका हे, प्राचीन रोमी साम्राज्यातील मासेदोनिया या शहराची राजधानी होते. त्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना "थेस्सलनीकाकर" असे म्हणत होते.
* थेस्सलनीका शहर हे महत्वाचे सागरी बंदर होते, आणि जो मोठा रस्ता रोम आणि रोमी साम्राज्याच्या पूर्व भागास जोडत होता, त्याच्या बाजूला स्थित होते.
* पौलाने, सीला आणि तीमथ्या ह्यांच्याबरोबर, त्याच्या सुवार्ताप्रसाराच्या दुसऱ्या यात्रेदरम्यान त्यांनी थेस्सलनीका शहराला भेट दिली आणि ह्याचा परिणाम म्हणून तेथे एक मंडळी स्थापन झाली. नंतर पौलाने त्याच्या तिसऱ्या सुवार्ता प्रसारच्या यात्रेदरम्यान सुद्धा या शहराला भेट दिली.
* पौलाने थेस्सलनीका येथील ख्रिस्ती लोकांना दोन पत्रे लिहिली. या पत्रांचा (थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र आणि थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र) समावेश नवीन करारात केला आहे.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [मासेदोनिया](../names/macedonia.md), [पौल](../names/paul.md), [रोम](../names/rome.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 01:1](rc://*/tn/help/1th/01/01)
* [2 थेस्सलनीकाकरांस पत्र 01:1-2](rc://*/tn/help/2th/01/01)
* [2 तीमथी 04:9-10](rc://*/tn/help/2ti/04/09)
* [प्रेषितांची कृत्ये 17:1-2](rc://*/tn/help/act/17/01)
* [फिलीप्पेकरास पत्र 04:14-17](rc://*/tn/help/php/04/14)
Strong's: G2331, G2332