mr_tw/bible/names/tamar.md

28 lines
2.7 KiB
Markdown

# तामार
## तथ्य:
जुन्या करारांमध्ये तामार नावाच्या बऱ्याच वेगवेगळ्या स्त्रिया होत्या. जुन्या करारामध्ये तामार नावाची अनेक शहरे किंवा इतर ठिकाणे आहेत.
* तामार ही यहूदाची सून होती. तिने पेरेसला जन्म दिला, जो येशू ख्रिस्ताचा पूर्वज होता.
* दावीद राजाच्या मुलींपैकी एकीचे नाव तामार होते; ती अबशालोमची बहीण होती. तिचा सावत्र भाऊ अम्मोनने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला भ्रष्ट केले.
* अबशालोम ह्याला तामार नावाची एक मुलगी देखील होती.
* "हससोन तामार" नावाचे शहर हे मृत समुदारच्या किनाऱ्याशी पश्चिम किनाऱ्याजवळ असलेल्या एनगेदी शहरासारखेच होते. तेथे देखील एक "बाल तामार" आहे, आणि "तामार" या ठिकाणाचे सामान्य संदर्भ, जे शहरांपासून भिन्न असू शकतात.
(हे देखील पाहा: [अबशालोम](../names/absalom.md), [पूर्वज](../other/father.md), [अम्मोन](../names/amnon.md), [दावीद](../names/david.md), [पूर्वज](../other/father.md), [यहूदा](../names/judah.md), [क्षार समुद्र](../names/saltsea.md))
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [१ इतिहास २:४](rc://*/tn/help/1ch/02/03)
* [२ शमुवेल १३:२](rc://*/tn/help/2sa/13/01)
* [२ शमुवेल १४:२५-२७](rc://*/tn/help/2sa/14/25)
* [उत्पत्ति ३८:६-७](rc://*/tn/help/gen/38/06)
* [उत्पत्ति ३८:२४](rc://*/tn/help/gen/38/24)
* [मत्तय १:१-३](rc://*/tn/help/mat/01/01)
## शब्द समुह:
* स्ट्रोंग: एच1193, एच2688, एच8412, एच8559