mr_tw/bible/names/silas.md

35 lines
4.7 KiB
Markdown

# सीला, सिल्वान
## तथ्ये:
सीला हा यरुशलेममधील विश्वासणाऱ्यांचा पुढारी होता.
* यरुशलेमेतील मंडळीच्या वडिलांनी पौल व बर्णबा यांच्याबरोबर पत्रे घेऊन अंत्युखियाला जाण्यासाठी सीला ह्याला नियुक्त केले.
* नंतरच्या काळात सीलाने लोकांना येशूविषयी शिकवण्यासाठी पौलाबरोबर इतर शहरांमध्ये प्रवास केला.
* फिलिप्पै येथे पौल व सीला यांना तुरुंगात टाकण्यात आले. ते तेथे असतानाच त्यांनी देवाची स्तुती केली आणि देवाने त्यांना तुरुंगातून सोडविले. त्यांच्या साक्षीचा परिणाम म्हणून तुरुंगाधिकारी ख्रिस्ती झाला.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखील पाहा: [अंत्युखिया](../names/antioch.md), [बर्णबा](../names/barnabas.md), [यरुशलेम](../names/jerusalem.md), [पौल](../names/paul.md), [फिलिप्पै](../names/philippi.md), [तुरुंग](../other/prison.md), [साक्ष](../kt/testimony.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 पेत्र 5:12](rc://*/tn/help/1pe/05/12)
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 1:1](rc://*/tn/help/1th/01/01)
* [2 थेस्सलनीकाकरांस पत्र 1:1](rc://*/tn/help/2th/01/01)
* [प्रेषितांची कृत्ये 15:22](rc://*/tn/help/act/15/22)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[47:01](rc://*/tn/help/obs/47/01)__ एके दिवशी, पौल आणि त्याचा मित्र __सीला__ हे फिलिप्पै नगरामध्ये येशूची सुवार्ता सांगण्यासाठी गेले.
* __[47:02](rc://*/tn/help/obs/47/02)__ तिने (लुदीया) पौल व __सीला__ यांना आपल्या घरी बोलाविले, तेव्हा ते तिच्या व तिच्या कुटुंबासोबत राहिले.
* __[47:03](rc://*/tn/help/obs/47/03)__ पौल आणि __सीला__ प्रार्थनेच्या स्थळी लोकांस वारंवार भेटले.
* __[47:07](rc://*/tn/help/obs/47/07)__ तेव्हा या गुलाम मुलीच्या धन्यांनी पौल व __सीला__ यांना रोमी अधिकाऱ्याकडे नेले व त्यांनी त्यांना मारहाण केली व तुरुंगामध्ये टाकले.
* __[47:08](rc://*/tn/help/obs/47/08)__ त्यांनी पौल व __सीला__ यांना तुरूंगाच्या एकदम आतल्या कोठडीत ठेवले व त्यांचे पाय खोड्यात अडकवले.
* __[47:11](rc://*/tn/help/obs/47/11)__ तुरूंगाचा अधिकारी पौल व __सीला__ यांच्याकडे जात असतांना थरथर कापत होता, तो म्हणाला, "माझे तारण व्हावे म्हणून मी काय करावे?"
* __[47:13](rc://*/tn/help/obs/47/13)__ दुसऱ्या दिवशी शहराच्या अधिका-यांनी पौल व __सीला__ यांची सुटका केली व फिलिप्पै शहर सोडून त्यांना जाण्यास सांगितले. तेव्हा पौल व __सीला__ यांनी लुदिया व इतर बंधूंना भेट दिली व नंतर त्यांनी ते शहर सोडले.
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: G46090, G46100