2.8 KiB
2.8 KiB
शमुवेल
तथ्य:
शमुवेल हा संदेष्टा आणि इस्राएलाचा शेवटचा शास्ते होता. त्याने शौल आणि दावीद दोघांनाही इस्राएलावर राजा म्हणून अभिषेकित केले.
- शमुवेल हा रामाच्या गावात एलकाना आणि हन्ना ह्यांच्या घरी जन्माला आला.
- हन्ना वांझ होती, म्हणून तिने देवाला कळकळीची प्रार्थना केली की, देवाने तिला एक पुत्र द्यावा. शमुवेल हा तिच्या प्रार्थनेचे उत्तर होता.
- हन्नाने वचन दिले की, जर तिने देवाला एक पुरुष मुलाला जन्माला देण्याची असाध्य विनंती केली असेल, आणि तिची विनंती मान्य झाली असेल, तर ती आपल्या मुलाला यहोवाला समर्पित करेल.
- देवाला दिलेले तिचे हे वचन पूर्ण करण्यासाठी, जेंव्हा शमुवेल तरुण मुलगा होता, तेंव्हा हन्नाने त्याला एली या मंदिरातील याजकाबरोबर राहण्यासाठी आणि त्याला मदत करण्यासाठी पाठवले.
- देवाने शमुवेलाला महान संदेष्टा म्हणून वाढवले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)
(हे सुद्धा पहा: हन्ना, शास्ते, संदेष्टा, यहोवा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 शमुवेल 01:19-20
- 1 शमुवेल 09:23-24
- 1 शमुवेल 12:16-18
- प्रेषितांची कृत्ये 03:24-26
- प्रेषितांची कृत्ये 13:19-20
- इब्री लोकांस पत्र 11:32-34
Strong's: H8050, G4545