mr_tw/bible/names/ruth.md

2.4 KiB

रुथ

तथ्य:

रुथ ही एक मवाबी स्त्री होती, जी अशा काळात राहत होती, जेंव्हा शास्ते इस्राएली लोकांचे नेतृत्व करत होते. मवाबमध्ये, इस्राएलामधील दुष्काळामुळे तिचे कुटुंब तेथे गेल्यानंतर तिने महलोन नावाच्या इस्राएली पुरुषाशी विवाह केला. महलोन मरण पावला, आणि त्यानंतर काही वेळाने तीने आपली सासू नामीसोबत इस्राएलामधील बेथलेहेम नगरात परत येण्यासाठी मवाब देश सोडला.

  • रूथ नामीशी एकनिष्ठ होती आणि तिने तिच्यासाठी अन्न मिळावे म्हणून खूप कष्ट केले.
  • तिने स्वतःला इस्राएलाचा एकच खरा देव, ह्याच्या सेवेसाठी समर्पित केले.
  • रुथने बवाज नावाच्या इस्राएली पुरुषाशी विवाह केला आणि ओबेद नावाच्या मुलाला जन्म दिला. ओबेद दावीद राजाचा आजोबा झाला आणि दावीद राजा येशूचा पूर्वज होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: बेथलहेम, बवाज, दावीद, शास्ते)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द समुह:

  • स्ट्रोंग: एच7327, एच4503