29 lines
3.4 KiB
Markdown
29 lines
3.4 KiB
Markdown
# राहाबाम
|
||
|
||
## तथ्य:
|
||
|
||
शलमोन राजाच्या मुलांपैकी राहाबाम हा एक मुलगा होता, आणि शलमोन मेल्यानंतर तो इस्राएल राष्ट्राचा राजा बनला.
|
||
|
||
* त्याच्या राज्याच्या सुरवातीला, राहाबाम त्याच्या लोकांशी क्रूरतेने वागला, म्हणून इस्राएलाच्या दहा कुळांनी त्याच्याविरुद्ध बंड केले आणि उत्तरेस "इस्राएलाचे राज्य" स्थापन केले.
|
||
* रहाबाम दक्षिणेकडील यहुदाच्या राज्याचा राजा म्हणून राज्य करत राहिला, ज्यामध्ये राहिलेल्या दोन कुलांचा, यहूदा आणि बन्यामीन ह्यांचा समावेश होता.
|
||
* राहाबाम हा एक दुष्ट राजा होता, ज्याने यहोवाची आज्ञा मानिली नाही, पण खोट्या देवांची उपासना केली.
|
||
|
||
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
|
||
|
||
(हे सुद्धा पहा: [इस्राएलाचे राज्य](../names/kingdomofisrael.md), [यहूदा](../names/kingdomofjudah.md), [शलमोन](../names/solomon.md))
|
||
|
||
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
||
|
||
* [1 इतिहास 03:10-12](rc://*/tn/help/1ch/03/10)
|
||
* [1 राजे 11:41-43](rc://*/tn/help/1ki/11/41)
|
||
* [1 राजे 14:21-22](rc://*/tn/help/1ki/14/21)
|
||
* [मत्तय 01:7-8](rc://*/tn/help/mat/01/07)
|
||
|
||
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
|
||
|
||
* __[18:05](rc://*/tn/help/obs/18/05)__ शलमोनाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र __रहोबाम__ हा राजा झाला. __रहोबाम__ हा मूर्ख मनुष्य होता.
|
||
* __[18:06](rc://*/tn/help/obs/18/06)__ __रहोबामाने__ मूर्खपणाने उत्तर दिले,‘‘तुम्हांस वाटले असेल की माझा पिता शल्मोन हयाने तुमच्याकडून परिश्रम करुन घेतले, परंतु मी तर त्याहीपेक्षा अधिक परिश्रम तुमच्याकडून करुन घेईन व तुमच्याशी क्रूरतेने वागेन.’’
|
||
* __[18:07](rc://*/tn/help/obs/18/07)__ इस्त्राएल राष्ट्राच्या दहा गोत्रांनी एकत्र येऊन __रहोबामाविरुद्ध__ बंड पुकारले. केवळ दोनच गोत्रे त्याच्याशी विश्वासू राहिली.
|
||
|
||
Strong's: H7346, G4497
|