mr_tw/bible/names/rahab.md

31 lines
3.2 KiB
Markdown

# राहाब
## तथ्य:
जेव्हा इस्राएलाने शहरावर हल्ला केला, तेव्हा राहाब ही एक स्त्री होती, जी यरीहोमध्ये राहत होती. ती एक वेश्या होती.
* राहाब हिने इस्राएलाच्या दोन हेरांना लपवले होते, जे इस्राएल लोकांनी यरीहोवर हल्ला करण्यापूर्वी, त्या शहराची टेहळणी करण्यासाठी गेले होते. तिने त्या हेरांना परत सुखरूप इस्राएलाच्या तंबूत परतण्यासाठी मदत केली.
* राहाब यहोवावर विश्वास ठेवू लागली.
* जेंव्हा यरीहोचा पाडाव केला, तेंव्हा ती आणि तिचे कुटुंब वाचले गेले, आणि ते सर्वजन इस्राएलमध्ये राहण्यास आले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखील पाहा: [इस्राएल](../kt/israel.md), [यरीहो](../names/jericho.md), [वेश्या](../other/prostitute.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [इब्री लोकांस पत्र 11:29-31](rc://*/tn/help/heb/11/29)
* [याकोबाचे पत्र 02:25](rc://*/tn/help/jas/02/25)
* [यहोशवा 02:21](rc://*/tn/help/jos/02/20)
* [यहोशवा 06:17-19](rc://*/tn/help/jos/06/17)
* [मत्तय 01:5](rc://*/tn/help/mat/01/04)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* त्या शहरामध्ये __रहाब__ नावाची एक वेश्या राहत होती. तिने त्या हेरांना आपल्या घरामध्ये लपवले व नंतर त्यांना निसटून जाण्यास मदत केली. तिने असे केले कारण तिने देवावर विश्वास ठेवला होता. जेव्हा इस्राएल लोक यरीहोचा नाश करतील तेव्हा __रहाब__ व तिच्या घराण्याचे रक्षण करण्याचे त्यांनी वचन दिले.
* देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएलांनी शहराचा नाश केला. त्यांनी केवळ __राहाब__ व तिच्या कुटुंबास जिवंत ठेविले, जे नंतर इस्राएलांचा एक भाग बनले.
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: H7343, G44600