mr_tw/bible/names/priscilla.md

23 lines
3.0 KiB
Markdown

# प्रिस्कील्ला
## तथ्य:
प्रिस्कील्ला आणि तिचा नवरा अक्विल्ला हे यहुदी ख्रिस्ती होते, ज्यांनी पौलाच्या सुवार्तेच्या कामात, त्याच्याबरोबर काम केले.
* प्रिस्कील्ला आणि अक्विल्ला ह्यांनी रोम सोडले कारण, सम्राटाने तिथल्या ख्रिस्ती लोकांना ते शहर सोडण्याची सक्ती केली.
* पौल करिंथमध्ये अक्विल्ला आणि प्रिस्कील्ला ह्यांना भेटला. ते राहुट्या (तंबू) बनवणारे होते, आणि पौल त्यांच्या कामात सामील झाला.
* जेंव्हा पौलाने सुरियाला जाण्यासाठी करिंथ सोडले, तेंव्हा प्रिस्कील्ला आणि अक्विल्ला त्याच्याबरोबर गेले.
* सुरिया येथून, ते तिघे इफिसला गेले. जेंव्हा पौलाने इफिस सोडले, तेंव्हा प्रिस्कील्ला आणि अक्विल्ला हे तिथेच मागे राहिले आणि तेथे सुवार्ता सांगण्याचे काम त्यांनी सुरु ठेवले.
* त्यांनी इफिसमध्ये विशेषकरून अपुल्लो नावाच्या मनुष्याला शिकवले, ज्याने येशूवर विश्वास ठेवला होता, आणि तो प्रतिभासंपन्न वक्ता आणि शिक्षक होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [विश्वास](../kt/believe.md), [ख्रिस्ती](../kt/christian.md), [करिंथ](../names/corinth.md), [इफिस](../names/ephesus.md), [पौल](../names/paul.md), [रोम](../names/rome.md), [सुरिया](../names/syria.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 करिंथकरांस पत्र 16:19-20](rc://*/tn/help/1co/16/19)
* [2 तीमथ्य 04:19-22](rc://*/tn/help/2ti/04/19)
* [प्रेषितांची कृत्ये 18:1-3](rc://*/tn/help/act/18/01)
* [प्रेषितांची कृत्ये 18:24-26](rc://*/tn/help/act/18/24)