mr_tw/bible/names/phonecia.md

24 lines
2.9 KiB
Markdown

# फेनिके
## तथ्य:
प्राचीन काळात, फेनिके हा कनान मधील श्रीमंत देश होता, जो भूमध्य किनाऱ्याच्या बाजूला, इस्राएलच्या उत्तरेला स्थित होता.
* फेनिके या देशाने व्यापलेला जमिनीचा प्रदेश होता, तो आताच्या लेबनान देशाचा पश्चिम प्रांत आहे.
* नवीन कराराच्या काळात, सोर हे शहर फेनिके देशाची राजधानी होते. सिदोन हे अजून एक फेनिके देशाचे महत्वाचे शहर होते.
* फेनिकेचे लोक, त्यांच्या लाकडीकामाच्या कौशल्याचा उपयोग करून, त्यांच्या देशाच्या मुबलक गंधसरू वृक्ष वापरून, एक महाग जांभळ्या रंगाच्या निर्मितीसाठी आणि समुद्रातून प्रवास आणि व्यापार करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे सुप्रसिद्ध होते. ते अत्यंत कुशल नौका बांधणारे सुद्धा होते.
* फेनिकेच्या लोकांनी तयार केलेल्या वर्णमाला या सर्वात जुन्या वर्णमालांपैकी एक होत्या. त्यांच्या वर्णमालाचा उपयोग सर्वत्र केला जात होता, कारण व्यापाराद्वारे त्यांचा संबंध अनेक लोकसमूहाशी येत होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहाः [गंधसरू](../other/cedar.md), [जांभळा](../other/purple.md), [सिदोन](../names/sidon.md), [सोर](../names/tyre.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 11:19-21](rc://*/tn/help/act/11/19)
* [प्रेषितांची कृत्ये 15:3-4](rc://*/tn/help/act/15/03)
* [प्रेषितांची कृत्ये 21:1-2](rc://*/tn/help/act/21/01)
* [यशया 23:10-12](rc://*/tn/help/isa/23/10)
Strong's: H3667, G4949, G5403