mr_tw/bible/names/paddanaram.md

23 lines
2.7 KiB
Markdown

# पदन अराम
## तथ्य:
पदन अराम हे एका प्रांताचे नाव आहे, जिथे अब्राहामाचे कुटुंब कनानच्या भूमीत स्थलांतरित होण्यापूर्वी राहत होते. ह्याचा अर्थ "अरामचे मैदान" असा होतो.
* जेंव्हा अब्राहामाने कनानला जाण्यासाठी पदन अराममधील हारान सोडले, तेंव्हा त्याच्या कुटुंबातील राहिलेल्यांपैकी बरेचजण हरानमध्येच थांबले.
* अनेक वर्षानंतर, अब्राहामाचा सेवक त्याच्या नातलागांमधून इसहाकसाठी बायको शोधण्यास पदन अराम येथे गेला, आणि तेथे त्याला रिबका सापडली, जी बथूवेलची नात होती.
* इसहाक आणि रिबकाचा मुलगा याकोब ह्यानेसुधा पदन अरामला प्रवास केला, आणि रिबकाचा भाऊ लाबान जो हरानमध्ये राहत होता, त्याच्या दोन मुलींना बायको करून घेतले.
* अराम, पदन अराम, आणि अराम-नाहराईम हे सर्व एकाच प्रांताचे भाग आहेत आणि सध्याचा सिरीया देश आहे तिथे स्थित होते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [अब्राहाम](../names/abraham.md), [अराम](../names/aram.md), [बथूवेल](../names/bethuel.md), [कनान](../names/canaan.md), [हरान](../names/haran.md), [याकोब](../names/jacob.md), [लाबान](../names/laban.md), [रिबका](../names/rebekah.md), [सिरीया](../names/syria.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति 28:1-2](rc://*/tn/help/gen/28/01)
* [उत्पत्ति 35:9-10](rc://*/tn/help/gen/35/09)
* [उत्पत्ति 46:12-13](rc://*/tn/help/gen/46/12)
Strong's: H6307