mr_tw/bible/names/noah.md

34 lines
3.5 KiB
Markdown

# नोहा
## तथ्य:
जेंव्हा देवाने सर्व दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी जगभर पूर पाठवला त्या काळामध्ये, नोहा हा मनुष्य होता, जो 4000 वर्षापूर्वी जगला. देवाने नोहाला एक अवाढव्य तारू बांधण्यास सांगितले, ज्यामध्ये तो आणि त्याचे कुटुंब राहू शकेल, जेंव्हा पुराचे पाणी पृथ्वीला आच्छादून टाकेल.
* नोहा हा एक धार्मिक मनुष्य होता, ज्याने सर्वामध्ये देवाची आज्ञा पाळली.
* जेंव्हा देवाने नोहाला अवाढव्य जहाज कसे बांधायचे हे सांगितले, तेंव्हा नोहाने अगदी देवाने सांगितले त्याच प्रकारे तारू बांधले.
* तारूच्या आतमध्ये, नोहा आणि त्याचे कुटुंब सुरक्षित राहिले, आणि नंतर त्यांची मुले आणि नातवंडे ह्यांनी ही पृथ्वी भरून टाकली.
* पुरानंतर जन्मलेला प्रत्येकजण नोहाचा वंशज आहे.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहा: [वंशज](../other/descendant.md), [तारू](../kt/ark.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति 05:30-31](rc://*/tn/help/gen/05/30)
* [उत्पत्ति 05:32](rc://*/tn/help/gen/05/32)
* [उत्पत्ति 06:8](rc://*/tn/help/gen/06/07)
* [उत्पत्ति 08:1](rc://*/tn/help/gen/08/01)
* [इब्री 11:7](rc://*/tn/help/heb/11/07)
* [मत्तय 24:37](rc://*/tn/help/mat/24/37)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[03:02](rc://*/tn/help/obs/03/02)__ परंतु __नोहावर__ परमेश्वराची कृपादृष्टी होती.
* __[03:04](rc://*/tn/help/obs/03/04)__ __नोहाने__ देवाची आज्ञा पाळली. त्याने आणि त्याच्या तिन्ही मुलांनी देवाने सांगितल्याप्रमाणे तारू बांधले.
* __[03:13](rc://*/tn/help/obs/03/13)__ दोन महिन्यानंतर देव __नोहास__ म्हणाला, “ तु व तुझे कुटुंब आता तारवाबाहेर येऊ शकता. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, “तुम्हाला पुष्कळ मुलेमुली व नातवंडे होवोत व पृथ्वी भरून टाका !” मग __नोहा__ व त्याचे कुटुंब तारवाबाहेर आले.
## शब्द माहिती:
* Strong's: H5146, G3575