mr_tw/bible/names/nileriver.md

31 lines
4.1 KiB
Markdown

# नील नदी (नाईल नदी), मिसराची नदी, नाईल
## तथ्य:
नाईल ही ईशान्येकडीलच्या आफ्रिकेतील सर्वात लांब आणि रुंद नदी आहे. ही विशेषकरून मिसरची मुख्य नदी म्हणून प्रसिद्ध आहे.
* नाईल नदी मिसरमधून उत्तरेला वाहते आणि भूमध्य समुद्राला जाऊन मिळते.
* नाईल नदीच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या सुपीक जमिनीमध्ये पिकांची वाढ चांगली होते.
* अधिकतर मिसरी लोक नाईल नदीच्या किनाऱ्याला राहत होते, कारण धान्य पिकासाठी लागणाऱ्या पाण्याचा तो एक महत्वाचा स्त्रोत होता.
* इस्राएल लोक गोशेनच्या प्रांतात राहिले, जो अतिशय सुपीक होता, कारण तो नाईल नदीच्या किनाऱ्याला स्थित होता.
* जेंव्हा मोशे बालक होता, तेंव्हा त्याच्या पालकांनी त्याला फारोच्या माणसांपासून वाचवण्यासाठी एका लाव्हाळ्याच्या पेटाऱ्यामध्ये ठेवून नाईल नदीमध्ये सोडले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [मिसर](../names/egypt.md), [गोशेन](../names/goshen.md), [मोशे](../names/moses.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [आमोस 08:7-8](rc://*/tn/help/amo/08/07)
* [उत्पत्ति 41:1-3](rc://*/tn/help/gen/41/01)
* [यिर्मया 46:7-9](rc://*/tn/help/jer/46/07)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[08:04](rc://*/tn/help/obs/08/04)__ त्या गुलामांच्या व्यापा-यांनी योसेफास मिसर देशामध्ये आणले. __नाईल नदीच्या__ तीरावर वसलेला मिसर देश हा एक मोठा, व सामर्थ्यशाली देश होता.
* __[09:04](rc://*/tn/help/obs/09/04)__ फारोने पाहिले की इस्राएल लोकांना पुष्कळ मुले होत आहेत, म्हणून त्याने आदेश दिला की इस्राएलांच्या पुत्र संतानांस __नाईल नदीमध्ये__ फेकून द्यावे.
* __[09:06](rc://*/tn/help/obs/09/06)__ जेंव्हा त्या बाळाचे आईवडिल त्यास लपवू शकले नाही, तेंव्हा त्यांनी त्या बाळास मृत्युपासून वाचविण्यासाठी त्याला एका तरंगणा-या टोपलीमध्ये ठेवून ती __नाईल नदीच्या__ तीरावर लव्हाळ्यात ठेवली.
* __[10:03](rc://*/tn/help/obs/10/03)__ देवाने __नाईल नदीच्या__ पाण्याचे रक्तामध्ये रूपांतर केले, पण तरीही फारो इस्राएलाची सुटका करावयास तयार झाला नाही.
Strong's: H2975, H4714, H5104