mr_tw/bible/names/nebuchadnezzar.md

33 lines
5.8 KiB
Markdown

# नबुखदनेस्सर
## तथ्य:
नबुखदनेस्सर हा बाबेल साम्राज्याचा राजा होता, ज्याच्या शक्तिशाली सैन्याने अनेक लोकसमूहांना आणि राष्ट्रांना काबीज केले होते.
* नबुखदनेस्सराच्या नेतृत्वाखाली, बाबेली सैन्याने यहुदाच्या राज्यावर हल्ला केला आणि ते जिंकले, आणि यहुदातील बऱ्यापैकी लोकांना बंदिवान म्हणून बाबेलाला घेऊन गेले. बंदिवानांना जबरदस्तीने 70 वर्षापर्यंत, "बाबेलातील हद्दपार केलेले" या नावाने तेथे राहण्यास भाग पाडले.
* हद्दपार केलेल्यांपैकी एक, दानीएल, ह्याने नबुखदनेस्सर राजाच्या काही स्वप्नांचा अर्थ सांगितला.
* आणखी तीन इस्राएली बंदिवान, हनन्या, मीशाएल, आणि अजऱ्या ह्यांना आगीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आले, जेंव्हा त्यांनी नबुखदनेस्सराने बनवलेल्या प्रचंड सोन्याच्या मूर्तीपुढे झुकण्यास नकार दिला.
* नबुखदनेस्सर राजा हा खूपच उद्धट होता आणि त्याने खोट्या देवांची उपासना केली. जेंव्हा त्याने यहूदावर विजय मिळवला, तेंव्हा त्याने यरुशलेमच्या मंदिरामधील अनेक सोन्याची आणि चांदीची भांडी चोरून नेली.
* कारण नबुखदनेस्सर हा घमंडी होता आणि खोट्या देवांची उपासना करण्यापासून माघारी वळण्यास त्याने नकार दिला, म्हणून याहोवा त्याला सात वर्षापर्यंत निराधार होऊन, प्राण्यांसारखे जगण्यास कारणीभूत झाला. सात वर्षानंतर, देवाने नबुखदनेस्सराची पुनर्रचना केली, जेंव्हा त्याने स्वतःला नम्र केले आणि एकाच देवाची, यहोवाची स्तुती केली.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [उद्धट](../other/arrogant.md), [अजऱ्या](../names/azariah.md), [बाबेल](../names/babylon.md), [हनन्या](../names/hananiah.md), [मीशाएल](../names/mishael.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 06:13-15](rc://*/tn/help/1ch/06/13)
* [2 राजे 25:1-3](rc://*/tn/help/2ki/25/01)
* [दानीएल 01:1-2](rc://*/tn/help/dan/01/01)
* [दानीएल 04:4-6](rc://*/tn/help/dan/04/04)
* [यहेज्केल 26:7-8](rc://*/tn/help/ezk/26/07)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[20:06](rc://*/tn/help/obs/20/06)__ सुमारे 100 वर्षांनंतर जेंव्हा अश्शूराने इस्त्रायल राज्याचा नाश केला, तेंव्हा देवाने यहूदाच्या राज्यावर हल्ला करण्यासाठी __नबूखद्नेस्सर__ हया बाबेलच्या राजास पाठविले. बाबेल हे एक शक्तिशाली राष्ट्र होते.
* __[20:06](rc://*/tn/help/obs/20/06)__ यहूदाचा राजा __नबुखद्नेस्सराचा__ सेवक बनण्यास तयार झाला व प्रतिवर्षी मोठया प्रमाणात पैसे देण्यासही तयार झाला.
* __[20:08](rc://*/tn/help/obs/20/08)__ यहूदाच्या राजाच्या हया बंडखोरपणाबद्दल शासन म्हणून __नबुखद्नेस्सरच्या__ सैनिकांनी यहूदाच्या राजाच्या मुलांचा त्याच्या समोर वध केला व यहूदाच्या राजाचे डोळे फोडून त्यास आंधळे केले.
* __[20:09](rc://*/tn/help/obs/20/09)__ __नबुखद्नेस्सर__ व त्याच्या सैनिकांनी यहूदाच्या राज्यातील जवळ जवळ सर्वच लोकांना बाबेलमध्ये आणले केवळ फार गरीब इस्त्रायल लोकांनाच शेती करण्यासाठी मागे ठेवले.
Strong's: H5019, H5020