mr_tw/bible/names/nazareth.md

33 lines
3.8 KiB
Markdown

# नासरेथ, नासोरी
## तथ्य:
उत्तरी इस्राएल मधील गालील प्रांतातील नासरेथ हे एक गाव होते. हे यरुशलेमेपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर होते, आणि पायी तेथे पोहोचण्यासाठी सुमारे तीन ते पाच दिवस लागत.
* योसेफ आणि मरिया हे नासरेथ गावाचे होते, आणि हेच ते ठिकाण आहे जिथे त्यांनी येशूला वाढीवले. म्हणून तर येशूला "नासोरी" म्हणून ओळखले जाते.
* नासरेथमध्ये राहणाऱ्या अनेक यहुद्यांनी येशूच्या शिक्षणाचा आदर केला नाही, कारण तो त्यांच्यामध्ये वाढला होता, आणि तो एक साधारण मनुष्य आहे असा ते विचार करीत.
* एकदा, जेंव्हा येशू नासरेथमधील मंदिरात शिकवत होता, तेंव्हा तिथल्या यहुद्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला, कारण तोच मसिहा आहे असा त्याने दावा केला आणि त्याला नाकारल्याबद्दल त्याने त्यांना दोष लावला.
* जेंव्हा नाथानएलने ऐकले की येशू नासरेथ या गावचा आहे, तेंव्हा त्याने जी टिप्पणी केली त्यावरून असे सूचित होते की, ते शहर अतिशय उच्च असे नव्हते.
(हे देखिल पहा: [ख्रिस्त](../kt/christ.md), [गालील](../names/galilee.md), [योसेफ](../names/josephnt.md), [मरिया](../names/mary.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 26:9-11](rc://*/tn/help/act/26/09)
* [योहान 01:43-45](rc://*/tn/help/jhn/01/43)
* [लुक 01:26-29](rc://*/tn/help/luk/01/26)
* [मार्क 16:5-7](rc://*/tn/help/mrk/16/05)
* [मत्तय 02:23](rc://*/tn/help/mat/02/22)
* [मत्तय 21:9-11](rc://*/tn/help/mat/21/09)
* [मत्तय 26:71-72](rc://*/tn/help/mat/26/71)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* **[23:04](rc://*/tn/help/obs/23/04)** योसेफ आणि मरीया यांना **नासरेथहून** बेथलेहेम असा लांबचा प्रवास करावा लागला, कारण त्यांचा पूर्वज दावीद हा बेथलेहेम गावाचा होता.
* **[26:02](rc://*/tn/help/obs/26/02)** येशू त्याच्या बालपणी राहात असलेल्या **नासरेथ** या ठिकाणी गेला.
* **[26:07](rc://*/tn/help/obs/26/07)** नासरेथातील लोकांनी येशूला पकडून ओढत डोंगराच्या कडयावरुन फेकून त्यास जीवे मारावे म्हणून नेले.
## शब्दमाहिती:
* Strong's: G3478, G3479, G3480