mr_tw/bible/names/moses.md

36 lines
4.2 KiB
Markdown

# मोशे
## तथ्य:
मोशे हा सुमारे 40 वर्षे इस्राएल लोकांचा संदेष्टा आणि पुढारी होता.
* जेंव्हा मोशे बालक होता, तेंव्हा त्याच्या पालकांनी त्याला मिसरी फारोपासून वाचवण्यासाठी एका लाव्हाळ्याच्या पेटाऱ्यामध्ये ठेवून नाईल नदीमध्ये सोडले. मोशेची बहिण मरिया ही त्याला पाहायला तेथे होती. जेंव्हा मोशे फारोच्या कन्येला सापडला तेंव्हा त्याला वाचवण्यात आले आणि तिने त्याला तिचा मुलगा म्हणून वाढवण्यासाठी राजमहालात नेले.
* देवाने इस्राएली लोकांना मिसरच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी व त्यांना वचनदत्त देशात नेण्यासाठी मोशेला निवडले.
* मिसरमधून बाहेर पडल्यावर आणि वाळवंटात भटकत असताना देवाने मोशेला दहा आज्ञा लिहिलेल्या दोन दगडी पाट्या दिल्या.
* त्याच्या जीवनाचा शेवट होत असताना, मोशेने वचनदत्त देश पहिले, पण तो त्यात जाऊन राहू शकला नाही, करण त्याने देवाची आज्ञा मानिली नाही.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहा: [मरिया](../names/miriam.md), [वचनदत्त भूमी](../kt/promisedland.md), [दहा आज्ञा](../other/tencommandments.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 07:21](rc://*/tn/help/act/07/20)
* [प्रेषितांची कृत्ये 07:30](rc://*/tn/help/act/07/29)
* [निर्गम 02:10](rc://*/tn/help/exo/02/09)
* [निर्गम 09:1](rc://*/tn/help/exo/09/01)
* [मत्तय 17:4](rc://*/tn/help/mat/17/03)
* [रोमकरास पत्र 05:14](rc://*/tn/help/rom/05/14)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* एके दिवशी मेंढरे चारत असतांना, __मोशेने__ एक झुडूप जळत असतांना पाहिले.
* __[12:05](rc://*/tn/help/obs/09/12)__ __मोशेने__ इस्राएलास सांगितले, "भिऊ नका! देव तुमच्या वतीने आज लढणार आहे व तुमचे तारण करणार आहे.”
* __[12:07](rc://*/tn/help/obs/12/05)__ देवाने __मोशेला__ तांबड्या समुद्रावर आपली काठी उभारण्यास व तो समुद्र दुभागण्यास सांगितले.
* __[12:12](rc://*/tn/help/obs/12/07)__ जेव्हा इस्राएलांनी पाहिले की मिसरी सैन्य मेले, तेव्हा त्यांनी देवावर व मोशे हा देवाचा संदेष्टा आहे याजवर विश्वास ठेवला.
* __[13:07](rc://*/tn/help/obs/12/12)__ मग देवाने या दहा आज्ञा दगडाच्या दोन पाट्यांवर लिहून __मोशेकडे__ दिल्या.
## शब्द माहिती:
* Strong's: H4872, H4873, G3475