mr_tw/bible/names/mishael.md

21 lines
2.9 KiB
Markdown

# मीशाएल
## तथ्य:
जुन्या करारांमध्ये मीशाएल नावाचे तीन मनुष्य होते.
* मीशाएल नावाचा एक मनुष्य होता जो अहरोनाचा चुलतभाऊ होता. जेंव्हा अहरोनाचे मुलगे, जसे देवाने त्यांना धूप चढवण्याची आज्ञा केली होती, त्या पद्धतीने धूप न चढवल्यामुळे देवाकडून मारले गेले, तेंव्हा त्याच्या मृत शरीरांना इस्राएली लोकांच्या तंबूच्या बाहेर नेण्याचे काम मीशाएल आणि त्याच्या भावाला देण्यात आले होते.
* अजून एक मनुष्य ज्याचे नाव मीशाएल होते, तो एज्राच्या बाजूला उभा होता, जेंव्हा पुन्हा शोध लावलेल्या नियमशास्त्राचे जाहीरपणे वाचन करण्यात आले.
* इस्राएली लोकांना बाबेलमध्ये बंदिवान म्हणून नेण्याच्या काळात, एक तरुण मनुष्य ज्याचे नाव मीशाएल होते, त्याला सुद्धा बंदी करून सक्तीने बाबेलमध्ये राहण्यासाठी घेऊन गेले. बाबेली लोकांनी त्याला "मेशख" हे नाव दिले. त्याने त्याचे सहकारी, अजऱ्या (अबेद्नगो) आणि हनन्या (शद्रख) ह्यांच्याबरोबर मिळून, राजाच्या मूर्तीची उपासना करण्यास नकार दिला आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हेही पाहा: [अहरोन](../names/aaron.md), [अजऱ्या](../names/azariah.md), [बाबेल](../names/babylon.md), [दानीएल](../names/daniel.md), [हनन्या](../names/hananiah.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [दानीएल 01:6-7](rc://*/tn/help/dan/01/06)
* [दानीएल 02:17-18](rc://*/tn/help/dan/02/17)
Strong's: H4332, H4333