mr_tw/bible/names/melchizedek.md

27 lines
3.7 KiB
Markdown

# मलकीसदेक
## तथ्य:
ज्यावेळी अब्राहम जिवंत होता, त्यावेळी मलकीसदेक हा शालेम (नंतरचे "यरुशलेम") नावाच्या शहराचा राजा होता.
* मलकीसदेकच्या नावाचा अर्थ "नितीमत्वाचा राजा" आणि त्याचे शीर्षक "शालेमचा राजा" ह्याचा अर्थ "शांतीचा राजा" असा होतो.
* त्याला "परात्पर देवाचा याजक" असे म्हटले आहे.
* पवित्र शास्त्रामध्ये मलकीसदेकाचा पहिल्यांदा उल्लेख, जेंव्हा अब्राहाम त्याचा भाचा लोट ह्याला शक्तिशाली राजांच्या हातातून सोडवून परत येत होता, तेंव्हा तो अब्राहमाला भाकर आणि द्राक्षरस घेऊन भेटायला आला असा केलेला आहे. अब्राहामाने मलकीसदेकाला त्याच्या लुटीतील दहावा भाग दिला.
* नवीन करारामध्ये, मलकीसदेकाचे वर्णन असा कोणीतरी ज्याला आई किंवा वडील कोणी नाहीत असे केले आहे. त्याला एक याजक आणि राजा असे नाव दिले गेले जो पुन्हा राज्य करील.
* नवीन करारसुद्धा असे म्हणतो की, येशू हा मलकीसदेकाप्रमाणे युगानयुग याजक आहे. इस्राएली याजक म्हणून येशू लेवी वंशातून उतरला नाही. त्याचे याजकपण थेट देवाकडून होते, जसे मलकीसदेकाचे होते.
पवित्र शास्त्रातील त्याच्या या वर्णनाच्या आधारावर, मलकीसदेक हा एक मानवी याजक होता, ज्याला देवानेसुधा येशूचे प्रतिनिधित्व किंवा त्याच्याकडे निर्देश करण्यासाठी निवडले होते, शांती आणि धार्मिकतेचा सार्वकालिक राजा आणि महान महायाजक.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [अब्राहम](../names/abraham.md), [सार्वकालिक](../kt/eternity.md), [महायाजक](../kt/highpriest.md), [यरुशलेम](../names/jerusalem.md), [लेवी](../names/levite.md), [याजक](../kt/priest.md), [धार्मिक](../kt/righteous.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति 14:17-18](rc://*/tn/help/gen/14/17)
* [इब्री 06:19-20](rc://*/tn/help/heb/06/19)
* [इब्री 07:15-17](rc://*/tn/help/heb/07/15)
* [स्तोत्र 110:4](rc://*/tn/help/psa/110/004)
Strong's: H4442, G3198