mr_tw/bible/names/marysisterofmartha.md

26 lines
2.4 KiB
Markdown

# मरिया (मार्थाची बहिण)
## तथ्य:
मरिया ही बेथानी येथील स्त्री होती, जी येशूचे अनुसरण करत होती.
* मरीयेला एक बहिण होती तिचे नाव मार्था आणि एक भाऊ होता त्याचे नाव लाजर होते, आणि ते दोघेही येशूचे अनुसरण करत होते.
* एके वेळी येशूने म्हंटले की, मरीयेने जो चांगला तो वाटा निवडला, जेंव्हा तिने मार्थेप्रमाणे जेवण बनवण्यासाठी चिंतातूर होण्यापेक्षा, येशू काय शिकवीत होता हे ऐकणे निवडले.
* येशूने मरिया हिचा भाऊ लाजर ह्याला मरणातून पुन्हा जिवंत केले.
* त्यानंतर काही काळाने, जेंव्हा येशू बेथानी येथील कोणाएकाच्या घरी जेवत असताना, मरीयेने त्याची उपासना करण्यासाठी म्हणून मौल्यवान सुगंधी अत्तर त्याच्या पायावर ओतले.
* असे केल्याबद्दल येशूने तिची प्रशंसा केली आणि म्हणाला की, ती माझे शरीर दफनविधीसाठी तयार करत आहे.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहा: [बेथानी](../names/bethany.md), [धूप](../other/frankincense.md), [लाजर](../names/lazarus.md), [मार्था](../names/martha.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [योहान 11:1-2](rc://*/tn/help/jhn/11/01)
* [योहान 12:1-3](rc://*/tn/help/jhn/12/01)
* [लुक 10:38-39](rc://*/tn/help/luk/10/38)
## शब्द माहिती:
* Strong's: G3137