mr_tw/bible/names/mary.md

42 lines
7.1 KiB
Markdown
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

# मरीया, येशूची आई
## तथ्य:
मरीया नासरेथ शहरात राहणारी एक तरुण स्त्री होती जी योसेफ नावाच्या एका पुरुषाशी विवाह करण्यास वचनबद्ध झाली होती. देवाने मसिहा, देवाचा पुत्र येशू याची माता होण्यासाठी मरीयाची निवड केली.
* मरीया कुमारी असतानादेखील, पवित्र आत्मा चमत्कारिक रीतीने ती गर्भवती राहण्यासाठी निमित्त झाला.
* एका देवदूताने मरीयाला सांगितले की तिच्याकडे जन्मलेला मुलगा देवाचा पुत्र आहे आणि तिने त्याचे नाव येशू असे ठेवले पाहिजे.
* मरीयेने देवावर प्रेम केले आणि तो तिच्यासाठी दयाळू झाला म्हणून तिने त्याची स्तुती केली.
* योसेफाने मरीयेशी विवाह केला, पण बाळाचा जन्म होईपर्यंत ती एक कुमारी राहिली.
* मेंढपाळ आणि मागी लोकांनी बाळ येशुबद्दल ज्या अद्भुत गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींबद्दल मरीयेने फार गांभीर्याने विचार केला.
* मरीया आणि योसेफ हे बाळ येशूला मंदिरात समर्पित करण्यासाठी घेऊन गेले. नंतर हेरोद राजाने बाळाला मारण्याच्या रचलेल्या कटातून सुटका करून घेण्यासाठी, ते त्याला मिसरास घेऊन गेले. अखेरीस ते नासरेथकडे परत आले.
* येशू प्रौढ असताना, जेंव्हा त्याने काना येथील लग्नात पाण्याचा द्राक्षरस केला, तेंव्हा मरीया त्याच्यासोबत होती.
* शुभवर्तमाने असेही नमूद करतात की, क्रुसावर येशू मरत असताना मरीया तेथे होती. त्याने आपला शिष्य योहान याला, आपल्या आईप्रमाणे तिची काळजी घेण्यास सांगितले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखील पहा: [Cana](../names/cana.md), [इजिप्त](../names/egypt.md), [हेरोद द ग्रेट](../names/herodthegreat.md), [येशू](../kt/jesus.md), [जोसेफ (NT)](../names/josephnt.md), [देवाचा पुत्र](../kt/sonofgod.md), [कुमारी](../other/virgin.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [योहान 02:4](../other/virgin.md)
* [योहान 02:12](rc://*/tn/help/jhn/02/03)
* [लुक 01:29](rc://*/tn/help/jhn/02/12)
* [लुक 01:35](rc://*/tn/help/luk/01/26)
* [मार्क 06:3](rc://*/tn/help/luk/01/34)
* [मत्तय 01:16](rc://*/tn/help/mrk/06/01)
* [मत्तय 01:19](rc://*/tn/help/mat/01/15)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* **[22:04](rc://*/tn/help/mat/01/18)** जेव्हा अलीशिबा ही सहा महिन्यांची गरोदर होती, तेंव्हा तोच देवदूत अलिशिबाच्या नात्यातील **मरीयेस** अचानक प्रकट झाला. ती कुमारी होती व योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर तीचे वाग्दान झाले होते. देवदूत म्हणाला,‘‘तू गर्भवती होऊन तूला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव. तो परात्पर परमेश्वराचा पुत्र असून सर्वकाळ राज्य करिल.
* **[22:05](rc://*/tn/help/obs/22/04)** देवदूताने स्पष्ट केले,‘‘पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि देवाचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. यास्तव ते बाळ पवित्र, देवाचा पुत्र असेल. देवदूताने सांगितलेल्या गोष्टीवर **मरीयेने** विश्वास ठेविला.
* **[22:06](rc://*/tn/help/obs/22/05)** देवदूताच्या भेटीनंतर लगेच **मरीया** अलीशिबा हीस भेटण्यास गेली **मरीयेचे** हे अभिवादन ऐकताच अलीशिबेच्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली.
* **[23:02](rc://*/tn/help/obs/22/06)** देवदूत म्हणाला,‘‘योसेफा, **मरीयेस** तू आपली पत्नी म्हणून स्विकारण्यास भिऊ नकोस. तिच्या उदरामध्ये असणारे बाळ हे पवित्र आत्म्यापासून आहे.
* **[23:04](rc://*/tn/help/obs/23/02)** योसेफ आणि **मरीया** यांना नासरेथहून बेथलेहेम असा लांबचा प्रवास करावा लागला, कारण त्यांचा पूर्वज दाविद हा बेथलेहेम गावाचा होता.
* **[49:01](rc://*/tn/help/obs/23/04)** देवाच्या एका दूताने **मरियेस** सांगितले की ती देवाच्या पुत्रास जन्म देणार आहे. म्हणून ती कुमारी असतांनाच तिने एका पुत्रास जन्म दिला आणि त्याचे नाव येशू ठेवले.
## शब्द माहिती:
* Strong's: G3137