mr_tw/bible/names/lazarus.md

4.5 KiB
Raw Permalink Blame History

लाजर

तथ्य:

लाजर आणि त्याच्या बहिणी, मरिया आणि मार्था, हे येशूचे विशेष मित्र होते. येशू सहसा बेथानी येथे त्यांच्या घरी त्यांच्या सोबत राहिला.

  • लाजर हा त्याला कबरेमध्ये पुरून अनेक दिवस झाल्या नंतरसुद्धा त्याला येशूने मृतांमधून उठवले या तथ्यांबद्दल प्रसिद्ध आहे.
  • ह्यामुळे यहुदी पुढारी येशूवर रागावले आणि त्याने हा चमत्कार केला म्हणून त्याचा द्वेष करू लागले, आणि ते येशू व लाजर या दोघांनाही मारण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू लागले.
  • येशूनेसुद्धा एका गरीब भिकारी आणि श्रीमंत मनुष्याची गोष्ट सांगितली, ज्यामध्ये त्या भिकाऱ्याला "लाजर" असे नाव दिले गेले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)

(हे सुद्धा पहा: भिकारी, यहुदी पुढारी, मार्था, मरिया, उठवणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 37:1 एके दिवशी, लाजर खूप आजारी असल्याची बातमी येशूला कळली. लाजर व त्याच्या दोन बहिणी मरीया व मार्था हे येशूचे जवळचे मित्र होते.
  • 37:2 येशू म्हणाला, ‘‘आपला मित्र लाजर हा झोपला आहे, मी त्याला उठवणे अगत्याचे आहे.
  • 37:3 येशूच्या शिष्यांनी उत्तर दिले, ‘‘प्रभुजी, जर लाजर झोपलेला आहे तर तो बरा होईल. तेंव्हा येशूने त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले, लाजर मेला आहे.
  • 37:4 जेंव्हा येशू लाजर राहत असलेल्या गावी आला, तेंव्हा लाजर मरुन चार दिवस झाले होते.
  • 37:6 येशूने त्यांना विचारले, ‘‘तुम्ही लाजारला कोठे ठेविले आहे?
  • 37:9 तेव्हा येशू मोठ्याने ओरडला,“लाजर, बाहेर ये!”’
  • 37:10 तर__लाजर__ बाहेर आला! तो अजूनही गंभीर कपड्यांमध्ये गुंडाळलेला होता.
  • __37:11__पण यहुद्यांच्या धार्मिक नेत्यांना हेवा वाटला, म्हणून त्यांनी येशू आणि लाजर यांना कसे मारता येईल याची योजना आखण्यासाठी एकत्र जमले.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: जी29760