31 lines
5.5 KiB
Markdown
31 lines
5.5 KiB
Markdown
# इस्राएलाचे राज्य
|
||
|
||
## तथ्य:
|
||
|
||
शलमोन राजा मरण पावल्यानंतर, इस्राएलाचे बारा गोत्र दोन राज्यांमध्ये विभागले गेले होते, तेव्हा इस्राएल राष्ट्राचा उत्तरेचा भाग हे इस्राएलाचे राज्य बनले होते.
|
||
|
||
* उत्तरेकडील इस्राएलाच्या राज्यामध्ये दहा कुळे होती, आणि दक्षिणेकडील यहुद्यांच्या राज्यामध्ये दोन कुळे होती.
|
||
* इस्राएल राष्ट्राची राजधानी शोमरोन होती. * हे यहुदाची राजधानी यरुशलेम पासून 50 किलोमीटर अंतरावर होते.
|
||
* इस्राएलच्या राज्याचे सर्व राजे दुष्ट होते. त्यांनी लोकांना मूर्तींची आणि खोट्या देवांची उपासना करण्यास प्रभावित केले.
|
||
* देवाने अश्शुराला इस्राएलावर आक्रमण करण्यासाठी पाठवले. बऱ्याच इस्राएली लोकांना अश्शूरमध्ये राहण्यासाठी बंदी करून नेण्यात आले.
|
||
* अश्शूराने उरलेल्या इस्त्राएल राज्याच्या लोकांमध्ये राहण्यासाठी परराष्ट्रीय लोकांस आणिले. या परराष्ट्रीय लोकांनी इस्राएल लोकांशी अंतरवंशीय विवाह केले, आणि त्यांच्या वंशजांना शोमरोनी लोक असे म्हंटले गेले.
|
||
|
||
(हे सुद्धा पहा: [अश्शुरी](../names/assyria.md), [इस्राएल](../kt/israel.md), [यहूदा](../names/kingdomofjudah.md), [यरुशलेम](../names/jerusalem.md), [शोमरोनाचे राज्य](../other/kingdom.md))
|
||
|
||
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
||
|
||
* [2 इतिहास 35:18-19](../names/samaria.md)
|
||
* [यिर्मया 05:10-13](rc://*/tn/help/2ch/35/18)
|
||
* [यिर्मया 09:25-26](rc://*/tn/help/jer/05/10)
|
||
|
||
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
|
||
|
||
* __[18:08](rc://*/tn/help/jer/09/25)__ इस्राएल राष्ट्राच्या अन्य दहा बंडखोर गोत्रांनी यरुबाम नावाच्या मनुष्यास आपला राजा म्हणून नेमले. त्यांनी उत्तरेच्या भागात आपल्या राज्याची स्थापना केली व त्यांस __इस्त्रायलचे राज्य__ असे संबोधण्यात आले.
|
||
* __[18:10](rc://*/tn/help/obs/18/08)__ __यहूदाचे राज्य__ व __इस्त्रायलचे राज्य__ एकमेकांचे शत्रू झाले व त्यांच्यामध्ये नेहमी लढाया होऊ लागल्या.
|
||
* __[18:11](rc://*/tn/help/obs/18/10)__ __इस्त्रायलाच्या नवीन राज्यामध्ये__, सर्वच राजे दुष्ट होते.
|
||
* __[20:01](rc://*/tn/help/obs/18/11)__ __इस्त्रायलाचे राज्य__ व यहूदाचे राज्य या दोहोंनीही देवाविरुध्द पाप केले.
|
||
* __[20:02](rc://*/tn/help/obs/20/01)__ अश्शूर हया दुष्ट व शक्तिशाली __राष्ट्राने इस्त्रायलाचा__ नाश केला. अश्शूरी लोकांनी __इस्त्रायलाच्या__ अनेक लोकांस जीवे मारिले, मौल्यवान वस्तूंची लूटालूट केली व देशाचा बराच भाग जाळून टाकला.
|
||
* __[20:04](rc://*/tn/help/obs/20/02)__ तेंव्हा अश्शूराने __इस्त्रायल__ राहत असलेल्या ठिकाणी परराष्ट्रीय लोकांस वस्ती करण्यासाठी आणिले. परराष्ट्रीयांनी नाश झालेल्या शहरांची पुनर्बांधणी केली व इस्त्रायली स्त्रीयांशी विवाह केला इस्त्रायली वंशातील ज्या लोकांनी परराष्ट्रीयांशी विवाह केला त्यांना शोमरोनी म्हणण्यात आले.
|
||
|
||
Strong's: H3478, H4410, H4467, H4468
|