mr_tw/bible/names/kadesh.md

28 lines
2.7 KiB
Markdown

# कादेश, कादेश-बर्णा, मरीबोथ कादेश
## तथ्य:
कादेश, कादेश-बर्णा, आणि मरीबोथ कादेश या सर्व नावांचा संदर्भ इस्राएलाच्या महत्वाच्या शहराशी येतो, जे इस्राएलाच्या दक्षिणी भागात, एदोमाच्या प्रांताजवळ स्थित होते.
* कादेश शहर हे मरुहीरवळीचे ठिकाण होते, असे ठिकाण जिथे सीन वाळवंटाच्या मध्येच पाणी आणि सुपीक जमीन होती.
* मोशेने कादेश-बर्णा येथून कनानच्या भूमीत बारा हेर पाठवले.
* वाळवंटात भटकत असताना इस्राएली लोकांनीसुद्धा कादेश येथे तंबू लावला होता.
* कादेश-बर्णा या ठिकाणी मिर्याम मेली होती.
* मरीबोथ कादेश हे ठिकाण होते, जेथे मोशेने देवाची आज्ञा मोडली, आणि इस्राएली लोकांच्यासाठी पाणी मिळवताना, देवाने सांगितल्याप्रमाणे खडकाला बोलण्याच्या ऐवजी त्याने खडकावर काठी आपटली.
* "कादेश" हे नाव इब्री शब्दापासून येते, आणि त्याचा अर्थ "पवित्र" किंवा "वेगळा केलेला' असा होतो.
(भाषांतर सूचना: [अनोळखी नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [वाळवंट](../other/desert.md), [एदोम](../names/edom.md), [पवित्र](../kt/holy.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [यहेज्केल 48:27-29](rc://*/tn/help/ezk/48/27)
* [उत्पत्ति 14:7-9](rc://*/tn/help/gen/14/07)
* [उत्पत्ति 16:13-14](rc://*/tn/help/gen/16/13)
* [उत्पत्ति 20:1-3](rc://*/tn/help/gen/20/01)
* [यहोशवा 10:40-41](rc://*/tn/help/jos/10/40)
* [गणना 20:1](rc://*/tn/help/num/20/01)
Strong's: H4809, H6946, H6947