mr_tw/bible/names/judasiscariot.md

35 lines
4.6 KiB
Markdown
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

# यहूदा इस्कार्योत
## तथ्य:
यहूदा इस्कार्योत हा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक होता. हा तोच होता ज्याने यहुदी पुढाऱ्यांसाठी येशूचा विश्वासघात केला.
* "इस्कार्योत" या नावाचा अर्थ "करीयोथ येथून" असा होऊ शकतो, कदाचित यहूदा त्या शहरात वाढला असे सूचित करतो.
* यहूदा इस्कार्योताने प्रेषितांच्या पैशाचे व्यवस्थापन केले व नियमितपणे स्वत:साठी वापरण्याकरता त्यापैकी काही चोरले.
* धार्मिक पुढाऱ्यांना, त्यांना येशूला अटक करता यावी म्हणून तो कुठे होता हे सांगून यहुदाने येशूचा विश्वासघात केला.
* धार्मिक नेत्यांनी येशूला जीवे मारण्यासाठी दोषी ठरवल्यानंतर, यहुदाने येशूचा विश्वासघात केला म्हणून त्याने पश्चात्ताप केला, म्हणून त्याने विश्वासघाताचा पैसा यहुदी पुढाऱ्यांना परत केला आणि नंतर आत्महत्या केली.
* अजून एक प्रेषित ज्याचे देखील नाव यहूदा होते, तो येशुंच्या भावांपैकी एक होता. येशूचा भाऊ याला "यहूदा" म्हणूनसुद्धा ओळखले जाते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहा: [प्रेषित](../kt/apostle.md), [विश्वासघात](../other/betray.md), [यहुदी पुढारी](../other/jewishleaders.md), [याकोबाचा मुलगा यहूदा](../names/judassonofjames.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [लुक 06:14-16](rc://*/tn/help/luk/06/14)
* [लुक 22:47-48](rc://*/tn/help/luk/22/47)
* [मार्क 03:19](rc://*/tn/help/mrk/03/17)
* [मार्क 14:10-11](rc://*/tn/help/mrk/14/10)
* [मत्तय 26:23-25](rc://*/tn/help/mat/26/23)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* **[38:02](rc://*/tn/help/obs/38/02)** येशू आणि शिष्य यरुशलेममध्ये आल्यानंतर, **यहूदा** धार्मिक पुढा-यांना जाऊन भेटतो व पैशांच्या मोबदल्यात येशूला पकडून देण्याविषयी बोलतो.
* **[38:03](rc://*/tn/help/obs/38/03)** तेंव्हा महायाजक व **यहूदी** पुढा-यांनी मिळून, येशूचा विश्वासघात करण्यासाठी यहूदाला चांदीची तीस नाणी दिले.
* **[38:14](rc://*/tn/help/obs/38/14)** **यहूदा** धार्मिक पुढारी, सैनिक व एका मोठया लोकसमुदायाबरोबर आला. * **यहूदा** येशूजवळ येऊन म्हणाला, ‘‘सलाम, गुरुजी, आणि त्याने त्याचे चुंबन घेतले.
* **[39:08](rc://*/tn/help/obs/39/08)** दरम्यान, येशूस धरुन देणा-या यहूदाने पाहिले की, **यहूदी** धर्मपुढा-यांनी येशूला मरणदंडाची शिक्षा दिली आहे. तेंव्हा यहूदास असे केल्याचा पस्तावा झाला व त्याने जाऊन आत्महत्या केली.
## शब्द माहिती:
* Strong's: G2455, G2469