mr_tw/bible/names/josiah.md

25 lines
2.8 KiB
Markdown

# योशीया
## तथ्य:
योशीया हा एक धार्मिक राजा होता, ज्याने यहुदाच्या राज्यावर एकतीस वर्षे राज्य केले. त्याने यहूदाच्या लोकांना पश्चात्ताप करून यहोवाची उपासना करण्याकडे त्यांचे नेतृत्व केले.
* त्याचा पिता रजा अमोन ह्याला मारल्यानंतर, वयाच्या आठव्या वर्षी योवाश यहुदाचा राजा बनला.
* त्याच्या कारकीर्दीच्या अठराव्या वर्षी, योवाश राजाने महायाजक हिल्कीया ह्याला देवाच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्याची आज्ञा दिली. हे पूर्ण करून होत असताना, नियमांचे पुस्तक सापडले.
* जेंव्हा योवाशला नियमांचे पुस्तक वाचून दाखवण्यात आले, तेंव्हा कसे त्याचे लोक देवाच्या आज्ञा मोडत होते, ह्याबद्दल तो दुःखी झाला. त्याने मूर्त्यांच्या उपासनेची सर्व स्थाने नष्ट करण्याची आणि त्या खोट्या देवांच्या सर्व याजाकांना ठार मारण्याची आज्ञा दिली.
* त्याने लोकांना पुन्हा वल्हांडणाचा सण साजरा करण्यास सुरवात करण्याची आज्ञा दिली.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [खोटे देव](../kt/falsegod.md), [यहूदा](../names/judah.md), [नियम](../other/law.md), [वल्हांडण](../kt/passover.md), [मंदिर](../kt/temple.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 03:13-14](rc://*/tn/help/1ch/03/13)
* [2 इतिहास 33:24-25](rc://*/tn/help/2ch/33/24)
* [2 इतिहास 34:1-3](rc://*/tn/help/2ch/34/01)
* [यिर्मया 01:1-3](rc://*/tn/help/jer/01/01)
* [मत्तय 01:9-11](rc://*/tn/help/mat/01/09)
Strong's: H2977, G2502