mr_tw/bible/names/joshua.md

37 lines
6.3 KiB
Markdown

# यहोशवा
## तथ्य:
पवित्र शास्त्रामध्ये यहोशवा नावाचे अनेक वेगवेगळे पुरुष होते. सर्वज्ञात असलेला यहोशवा हा नुनाचा मुलगा, जो मोशेचा मदतनीस होता, आणि जो नंतर देवाच्या लोकांचा महत्वाचा नेता बनला.
* वचनदत्त भूमीची हेरगिरी करण्यास मोशेने पाठवलेल्या बारा जणांपैकी यहोशवा एक होता.
* कालेबबरोबरच, यहोशवाने इस्राएली लोकांना वचन दिलेल्या देशात प्रवेश करण्याबद्दल आणि कनानी लोकांवर विजय मिळवण्यासाठी देवाच्या आज्ञेचे पालन करण्याचे आवाहन केले.
* मोशे मेल्यानंतर, बऱ्याच वर्षांनी, देवाने इस्राएल लोकांचे नेतृत्व वचनदत्त भूमीत करण्यासाठी यहोशवाला नियुक्त केले.
* कनानी लोकांविरुद्धच्या सर्वात प्रथम आणि सर्वात प्रसिद्ध लढाईत, यहोशवाने इस्राएलांचे यरीहो शहराला पराभूत करण्यासाठी नेतृत्व केले.
* जुन्या करारातील यहोशवा नावाच्या पुस्तकात, यहोशवाने वचनदत्त भूमीचा कब्जा घेण्यासाठी कसे इस्राएल लोकांचे नेतृत्व केले, आणि इस्राएलातल्या प्रत्येक गोत्राला, त्या भूमीत राहण्यासाठी कसा त्याने प्रांत नेमून दिला याविषयी सांगितले आहे.
* योसादाकाचा मुलगा यहोशवा ह्याचा उल्लेख हग्गय आणि जखऱ्या या पुस्तकात आला आहे; तो एक महायाजक होता, ज्याने यरुशलेमेची पडलेली भिंत पुन्हा बांधण्यास मदत केली.
* यहोशवा नावाच्या इतर अनेक पुरुषांचा उल्लेख वंशावळीत आणि पवित्र शास्त्रामधील इतर ठिकाणी नमूद केलेला आहे.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पाहा: [कनान](../names/canaan.md), [हग्गय](../names/haggai.md), [यरीहो](../names/jericho.md), [मोशे](../names/moses.md), [वचनदत्त भूमी](../kt/promisedland.md), [जखऱ्या](../names/zechariahot.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 07:25-27](rc://*/tn/help/1ch/07/25)
* [अनुवाद 03:21-22](rc://*/tn/help/deu/03/21)
* [निर्गम 17:8-10](rc://*/tn/help/exo/17/08)
* [यहोशवा 01:1-3](rc://*/tn/help/jos/01/01)
* [गणना 27:18-19](rc://*/tn/help/num/27/18)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[14:04](rc://*/tn/help/obs/14/04)__ जेव्हा इस्राएल लोक कनान देशाच्या सीमेवर आले, तेव्हा मोशेने इस्राएलाच्या बारा वंशामधून प्रत्येकी एक अशा बारा मनुष्यांस निवडले. त्याने त्या मनुष्यांस कसे जावे व देश कसा हेरावा याविषयी सुचना देऊन तो देश कसा आहे हे बघायला सांगितले.
* __[14:06](rc://*/tn/help/obs/14/06)__ लगेच कालेब आणि __यहोशवा __ हे दोघे हेर म्हणाले, "कनानी लोक उंच व बलाढ्य आहेत ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण त्यांचा निश्चितपणे पराभव करु शकतो.
* __[14:08](rc://*/tn/help/obs/14/08)__ लगेच कालेब आणि __यहोशवा__ हे दोघे हेर म्हणाले, "कनानी लोक उंच व बलाढ्य आहेत ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण त्यांचा निश्चितपणे पराभव करु शकतो.
* __[14:14](rc://*/tn/help/obs/14/14)__ मोशे आता वयोवृद्ध झाला असल्यामूळे परमेश्वराने लोकांचे नेतृत्व करण्यास त्याची मदत करण्यासाठी __यहोशवाची__ निवड केली.
* __[14:15](rc://*/tn/help/obs/14/15)__ __यहोशवा__ एक चांगला नेता झाला कारण त्याने देवावर विश्वास ठेविला व त्याच्या आज्ञा पाळल्या.
* __[15:03](rc://*/tn/help/obs/15/03)__ यार्देन नदी पार केल्यानंतर, देवाने __यहोशवास__ सांगितले की कशा प्रकारे त्यांनी मजबूत यरीहो नगरावर हल्ला करावा.
Strong's: H3091, G2424